Chaturgrahi Yog 2023: हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरु झालेला आहे. श्रावणाच्या एक दिवस आधीच ग्रहस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण बदल घडून आल्याने अनेक शुभ राजयोग या कालावधीत तयार होत आहेत. १७ ऑगस्ट २०२३ला या वर्षातील सर्वात महत्त्वाचे असे सूर्याचे गोचर सुद्धा पूर्ण झाले आहे. सूर्यदेव तब्बल ३६५ दिवसांनी स्वतःच्या सिंह राशीत परतले आहेत. सिंह राशीत अगोदरच बुध, मंगळ, आणि चंद्रमा उपस्थित आहेत अशातच सूर्याच्या प्रवेशाने सिंह राशीत अत्यंत दुर्मिळ असा चतुर्ग्रही राजयोग तयार झाला आहे. हा राजयोग मेष ते मीन सर्व राशींवर प्रभावी असणार आहे. पण ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार चार अशा राशी आहेत ज्यांना या काळात अचानक व अनपेक्षित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या मंडळींना नेतृत्व करण्याची नामी संधी यावेळी मिळू शकते.

चतुर्ग्रही योग बनल्याने ‘या’ राशींना होणार बंपर लाभ?

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

वृषभ राशीच्या मंडळींसाठी चतुर्ग्रही राजयोग हा मोठे बदल घेऊन येऊ शकतो. तुम्हाला या कालावधीत नशिबाची तगडी साथ लाभू शकते ज्यामुळे अनपेक्षित प्रमाणात धनलाभाची चिन्हे आहेत. ताण- तणाव दूर होऊन घरात हसते- खेळते वाटचारां राहील. अडकून पडलेली कामे मार्गी लागतील. संपत्तीशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो त्यावेळेस मात्र भावनिक होणे टाळावे. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत.

Mangal Gochar 2024 Mars will enter Moons house after 18 months three lucky zodiac signs will get immense money and wealth
१८ महिन्यानंतर मंगळ करणार चंद्राच्या घरात प्रवेश, ‘या’ तीन राशींचे नशीब पालटणार, मिळणार अपार पैसा अन् धनसंपत्ती
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Is waking up late better than rising early? A neurologist breaks it down for us Sleep tips
लवकर उठण्यापेक्षा उशिरा उठणे चांगले? वाचा न्यूरोलॉजिस्ट काय सांगतात
accuracy of facial recognition technology
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवताना सावधान!
tanishk vice president arun narayan
‘नैसर्गिकच्या तुलनेत कृत्रिम हिऱ्यांना अनेकांगी मर्यादा’; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायण यांचे प्रतिपादन
Agricultural policy changes Increase in edible oil import duty Elections farmer print eco news
कृषिधोरण बदलांची क्षेपणास्त्रे ‘बूमरॅंग’ होणार?
tanishq
नैसर्गिक हिऱ्यांना कृत्रिम पर्याय नाही; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायणन यांची माहिती
Risk of Heart Attack During Angiography
अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

मिथुन राशीसाठी सुद्धा चतुर्ग्रही राजयोग हा शुभ फलदायक असणार आहे. या राशीच्या मंडळींची ऊर्जा ही अत्युच्च असेल. सूर्याच्या गोचराचा प्रभाव आत्मविश्वासात दिसून येईल त्यामुळे तुम्हाला जी कामं करण्यात संकोच वाटत होता पण इच्छा होती, ती सर्व कामे मार्गी लावता येतील. विशेष म्हणजे या नेहमीपेक्षा वेगळ्या मार्गातूनच आपल्याला अधिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या कामांसाठी तुम्हाला नेतृत्व करावे लागू शकते.

तूळ रास (Libra Zodiac Horoscope)

चतुर्ग्रही योग बनल्यामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. कारण हा योग तुमच्या संक्रमण कुंडलीतून दहाव्या घरात तयार होणार आहे. जे व्यवसाय आणि नोकरीचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. यावेळी तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या वडिलांची साथ मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यावेळी यश मिळू शकते.

हे ही वाचा<< ‘बुधादित्य राजयोग’ आजपासून ‘या’ राशींचे नशीब बदलणार; श्रावणात तुम्हीही तन- मन- धनाने व्हाल समृद्ध

वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)

चतुर्ग्रही योग तयार झाल्यामुळे तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. कारण तुमच्या पारगमन कुंडलीत नवव्या स्थानात हा योग तयार होणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळेल. तसेच दीर्घकाळ रखडलेली कामेही करता येतील. यावेळी तुम्ही व्यवसाय संबंधित प्रवास करू शकता. जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याच वेळी, आपण यावेळी वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)