Shravan Somwar 2023: आज, २१ ऑगस्ट २०२३ हा यंदाचा पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात महत्त्व आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला जात असून तो शंकराला समर्पित आहे.जेव्हा भगवान विष्णू चार महिन्यांसाठी निद्रा अवस्थेत जातात. तेव्हा महादेव या सृष्टीचे चक्र चालवतात, असं म्हटलं जातं. असे मानले जाते की जे लोक श्रावण सोमवारी उपवास करतात, भगवान शिव त्यांना सुख, आरोग्य, संपत्ती प्रदान करतात आणि इच्छित इच्छा पूर्ण करतात. महादेव श्रीशंकर हे भोलेनाथ म्हणून ओळखले जातात त्यामुळे मोठमोठ्या भेटी, नेवैद्य यापेक्षा भक्तांनी पवित्र मनाने केलेला मंत्रजप सुद्धा जास्त प्रसन्न करू शकतो. श्रावणी सोमवारी विशेषतः कोणत्या मंत्रांचा जप करायला हवा हे पाहूया, तसेच आज कोणती शिवमूठ वाहिली जाणार हे सुद्धा जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रावणी सोमवार २०२३: पहिली शिवामूठ

पहिली शिवमूठ म्हणून तांदूळ वाहण्याची प्रथा आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।‘ हा मंत्र म्हणावा. प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहताना “शिवा शिवा महादेवा.. माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, “ असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी.

श्रावणी सोमवारी करावा हा मंत्रजाप

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बन्धनान्

मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

कर्पूर गौरम करुणावतारम् संसारसारम् भुजगाईंद्र हरम सदा वसंतम् हृदय अरविंदे भवम भवानी साहित्यम् नमामि..!!

ओम नमः शिवाय..!!

हे ही वाचा<< स्वतंत्र व निडर असतात ‘या’ व्यक्ती; तीन अंक ठरवतोय त्यांचं भाग्य, तुम्ही या यादीत आहात का, वाचा

तुम्हाला माहित आहे का?

‘सोमवार’ हा शब्द संस्कृत शब्द ‘सोम’ म्हणजे चंद्र या हिंदू देवता चंद्रापासून आला आहे आणि भगवान शिव त्यांच्या कपाळावर अर्धचंद्र धारण करतात म्हणून भगवान शिव ‘सोमेश्वर’ म्हणून ओळखले जातात. श्रावणातील सोमवाराला सुद्धा यामुळेच विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shravan somwar 2023 mahdev stuti mantra chanting what is first shivamuth puja vidhi shubh muhurta blessing by shankar svs
Show comments