12th August 2024 Marathi Panchang & Rashi Bhavishya: आज १२ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. हिंदू धर्मात, श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्व आहे. या दिवशी भगवान शंकरांची प्रार्थना केली जाते. आजच्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षातील उदय तिथी सप्तमी आहे. सोमवारी सप्तमी तिथी सकाळी ७.५६ पर्यंत राहील, त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल. तसेच आज संध्याकाळी ४:२६ पर्यंत राहील. तसेच १२ ऑगस्टला स्वाती नक्षत्र सकाळी ८.३३ पर्यंत राहील, त्यानंतर विशाखा नक्षत्र दिसेल. तसेच अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत असेल. तर श्रावणातला दुसरा सोमवार मेष ते मीन या १२ राशींना कसा जाईल, कोणावर असेल भगवान शंकरांची विशेष कृपा राहिल हे ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

१२ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

Daily Horoscope 13 January 2025
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
shani surya budha will make tigrahi yog 2025
Tirgrahi Yog 2025 : ५० वर्षांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब! बुध, सूर्य अन् शनीच्या संयोगाने होतील गडगंज श्रीमंत, वाढेल मानसन्मान
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
Shani and shukra made dhanadhya yoga
३० वर्षानंतर धनाढ्य योगामुळे ‘या’ राशींचे नशीब चमकणार! शनी आणि शुक्राची होईल असीम कृपा

मेष:- चांगली बातमी समजेल. खेळ व मनोरंजन यात वेळ निघून जाईल. कटू प्रसंगाचे रूपांतर गोडव्यात कराल. अति विचार करत राहू नये. जोडीदाराचे सहकार्य अपेक्षित राहील.

वृषभ:- जोडीदार तुमच्यावर खुश राहील. जवळच्या प्रवासाची संधी मिळेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. सामाजिक बांधीलकी विसरून चालणार नाही. भावंडांसोबत अनमोल क्षण घालवाल.

मिथुन:- चालत आलेली संधी ओळखा. जोडीदाराकडून आश्चर्यचकित केले जाईल. कामातून समाधान मिळेल. मित्रांचा रोष गोडीने कमी करावा. मन प्रसन्न राहील.

कर्क:-मुलांसाठी चांगला काळ आहे. नवीन नोकरी शोधात असणार्‍यांना यश येईल. आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल. हातात नवीन अधिकार येतील. मुलांच्या जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल.

सिंह:-आत्मविश्वासाने निर्णय घ्या. नोकरीमध्ये चांगला काळ असेल. आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. व्यापार्‍यांच्या प्रयत्नाला यश येईल. विरोधक नामोहरम होतील.

कन्या:-प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. मेहनत, आणि प्रयत्न यांची कास सोडू नये.

तूळ:-बोलण्यातून इतरांची माने जिंकाल. संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. झोपेची तक्रार जाणवेल.

वृश्चिक:-आजचा दिवस मनासारखा जाईल. जुनी येणी वसूल होतील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. एखादी जुनी समस्या संपुष्टात येईल.

धनू:-मनातील नसत्या शंका काढून टाकाव्यात. खर्चावर नियंत्रण ठेवा. विरोधक परास्त होतील. कार्यालयात प्रशंसेस पात्र व्हाल. क्रोधवृत्तीत वाढ होईल.

मकर:-जुनी खोळंबलेली कामे मार्गी लागतील. इतरांच्या विश्वासाला खरे उतरा. आर्थिक पातळीवर यशकारक दिवस. मिळकतीच्या बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कुंभ:-नोकरी-व्यवसायात सन्मान मिळेल. दिवस धावपळीत जाईल. भावंडांची मदत मोलाची ठरेल. मन प्रसन्न राहील. नवीन ओळख वाढवावी.

मीन:-चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. घरातील महत्त्वाच्या कामात हातभार लावाल. गोड शब्दात मत मांडावे. शक्यतो नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. चांगल्या गोष्टीसाठी खर्च करा.

  • ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader