2nd September Panchang & Marathi Rashi Bhavishya : आज २ सप्टेंबर २०२४ रोजी शेवटचा म्हणजे पाचवा श्रावणी सोमवार असणार आहे. आज शिवभक्त शंकराची मनोभावे पूजा करतील. शंकराला पाचव्या श्रावणी सोमवारी हरभऱ्याची शिवामूठ वाहायची आहे. तर आज श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असणार आहे. अमावस्या तिथी पहाटे ५ वाजून २१ मिनिटांनी सुरु होईल. तसेच सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांपर्यंत शिवयोग चालू राहणार आहे. तसेच मघा नक्षत्र सोमवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांपर्यंत असेल. राहू काळ पहाटे ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असेल. तर श्रावणातला शेवटचा सोमवार मेष ते मीन राशींचा कसा जाईल, कोणावर असणार महादेवाची कृपा ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- अति घाईत निर्णय घेऊ नका. मनावर ताबा ठेवा. जटिल समस्येवर तोडगा निघू शकेल. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृषभ:- हातातील काम पूर्ण होईल. आज अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. जवळचा प्रवास सुखाचा होईल. प्रेमातील व्यक्तीसाठी नातेसंबंध दृढ करणारा दिवस.

मिथुन:- दिवसभर कामाची लगबग राहील. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. दुसर्‍यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सहकार्‍यांना कमी लेखू नका. टीमवर्कचे महत्त्व लक्षात घ्यावे.

कर्क:- धावपळीचा दिवस राहील. आपल्याच नादात दिवस घालवाल. स्वत:च्याच मताला चिकटून राहाल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मित्राची गाठ पडेल.

सिंह:- सरकारी कामे पुढे सरकतील. प्रकृतीस जपावे. वादविवादात आपली सरशी होईल. व्यावसायिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. फार काळजी करू नये.

कन्या:- स्वत:वर कायम विश्वास ठेवावा. विजय तुमचाच होईल. आपली जबाबदारी ओळखून काम कराल. तुमची प्रतिमा उंचावेल. अधिकची कामे अंगावर पडतील.

तूळ:- निर्णयाचा पुनर्विचार करावा. जुनी देणी फेडाल. घरात शांतता ठेवावी. अनावश्यक खर्चाला कात्री लावावी. दिनचर्येत थोडासा बदल करून पाहावा.

वृश्चिक:- नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल. उत्साहात दिवस जाईल. दिवसाची सुरुवात संपर्क साधण्यात जाईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल.

धनू:- दिवस कामात व्यस्त राहील. खर्चिक कामे निघतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नवीन ओळख वाढवताना सावध रहा. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील.

मकर:- नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. हलगर्जीपणा करून चालणार नाही. दिवस उत्साही असेल. आनंदी मनाने कार्यरत राहाल. प्रलोभनाला भुलू नका.

कुंभ:- रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. व्यायामात खंड पडू देऊ नका. मुलांची चिंता सतावेल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आव्हानांचा सामना करावा.

मीन:- नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. आततायीपणे कामे करू नका. आत्ममग्न राहाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर