Life Changing Lessons to Learn from Lord Krishna : आपण लहानपणापासून भगवान श्रीकृष्णाच्या कथा ऐकल्या असतील. भगवान श्रीकृष्णाच्या लीला म्हणजे त्यांच्या जीवनातील विविध गोष्टी आणि घटनांद्वारे आपल्याला प्रेम, करुणा आणि शक्ती दिसून आली. कृष्णाचे बालपण आणि गीतेतील उपदेशांचा समावेश आहे. हा कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर आपल्याला त्यातून खूप काही शिकायला मिळते. श्रीकृष्णाचे जीवन फक्त एक यशोगाथा आहे जे आपल्याला प्रत्येक अडचणीचा सामना हसमुख करण्यास प्रेरणा देते. योग्य मार्ग कसा निवडावा, प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत स्वत:वर विश्वास कसा ठेवावा, हे आपण श्री कृष्णापासून शिकतो. आज आपण जाणून घेणार आहोत की कसे श्रीकृष्णाच्या जीवनापासून बोध घेत आपण स्वत:चे कल्याण करू शकतो.

कर्मावर लक्ष द्या

श्रीकृष्ण म्हणतात – कर्म करावे, फळाची अपेक्षा करू नये. अनेकदा आपण कोणतेही काम यासाठी करतो त्याचे फळ आपल्याला लवकर मिळो. पण जेव्हा असं घडत नाही, तेव्हा आपण निराश होतो. त्यामुळे आपण आधी कर्मावर लक्ष द्यावे आणि प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी.

अडचणीच्या वेळी माघार घेऊ नका

जीवनात कधी कधी अशी वेळ येते आहे, जेव्हा सर्वकाही आपल्या विरोधात असते पण त्यावेळी घाबरू नका तर स्वत:वर विश्वास ठेवा. श्रीकृष्ण म्हणतात, घाबरून बसण्यापेक्षा काहीही करू नका, तर अडचणीच्या वेळी ठामपणे उभे राहा.

जीवनात काहीही सहज घडत नाही

अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपल्याबरोबरच वाईट का होतं? पण श्रीकृष्ण असं म्हणतात की जीवनात काही गोष्टी कारणाशिवाय घडत नाही. जे होत आहे, त्यात काहीतरी दडलेलं असतं. जर आपण प्रत्येक घटनेला समजण्याचा प्रयत्न करू, तर दु:ख सुद्धा आपल्याला मजबूत बनू शकते.

ध्येय बदलू नका, तर पद्धत बदला

अनेक जण वारंवार प्रयत्न करूनही यश मिळवू शकत नाही. त्यामुळे ते ध्येय बदलतात. पण श्रीकृष्ण म्हणतात की ध्येय नाही तर आपली रणनीती बदला.

वर्तमानात जगा

आपल्यापैकी अनेक जण भूतकाळात अडकलेले असतात किंवा येणाऱ्या काळाविषयी चिंता व्यक्त करतात. पण श्रीकृष्ण सांगतात की जे क्षण आपल्याजवळ आहे, ते अत्यंत मौल्यवान आहे. त्याला मनापासून जगा आणि खूश राहा आणि दुसऱ्यांना पण खूश ठेवा.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)