Shree Krishna Janmashtami 2023 Date and Time : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा केला जातो. या वर्षी ६ सप्टेंबर रोजी देशभरात जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मीयांमध्ये श्रीकृष्ण जन्म पवित्र उत्सव मानला जातो. या दिवशी अनेक घराघरांत, मंदिरात रात्री १२ वाजता श्रीकृष्णाची बाल मूर्ती पाळण्यात ठेवून मनोभावे पूजा करीत जन्माष्टमीचा सोहळा साजरा होतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा रात्री १२ वाजताच का सुरू होतो? जाणून घेऊ …

विष्णूचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला बुधवारी द्वापारयुगातील रोहिणी नक्षत्रात झाला. भगवान श्रीकृष्ण हे जन्माआधीच सिद्धींनी संपन्न होते. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मावेळची एक आख्यायिका सांगितले जाते की, कंसाने आपली बहीण देवकी हिचा वसुदेवाशी विवाह करून दिला. या विवाहानंतर तिला रथात बसवून तो निरोप देत होता. त्यावेळी एक आकाशवाणी झाली, की, देवकीच्या आठव्या मुलाच्या हातून कंसाचा वध होईल. त्यानंतर घाबरलेल्या कंसाने वसुदेव आणि देवकीला तुरुंगात टाकले. त्यानंतर कंसाने देवकीच्या एक-एक करून सहा मुलांचा वध केला. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कंसाने वसुदेव आणि देवकीला डांबलेल्या तुरुंगाची सर्व कुलपे तुटून पडली. यादरम्यान सर्व सैनिक गाढ झोपले होते. या रात्री आभाळ दाट ढगांनी झाकले होते. जोरदार पाऊस पडू लागला. विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”

देवाच्या जन्मासाठी निवडलेले नक्षत्र आणि वेळ अनेक अर्थांनी विशेष आहे. त्यामुळे श्रीकृष्णाचा जन्म जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री का झाला? जाणून घेऊ. एवढेच नाही तर ज्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला तो दिवस बुधवार होता. त्यामागेही एक रहस्य होते. या रहस्यावर एक नजर टाकू या…

श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री का झाला? (Reason Why Shri Krishna Born at Midnight)

श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री होण्याचे मुख्य कारण म्हणजे तो चंद्रवंशी (यदुवंश) होता. धार्मिक मान्यतेनुसार, श्रीकृष्ण हा चंद्रवंशी होता. श्रीकृष्णाचे पूर्वज चंद्रदेव होते आणि बुध चंद्राचे पुत्र होते. त्या कारणास्तव श्रीकृष्णाने चंद्रवंशात जन्म घेण्यासाठी बुधवारची निवड केली. ज्योतिषांच्या मते, रोहिणी ही चंद्राची प्रिय पत्नी आणि नक्षत्र आहे; ज्यामुळे श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला. त्याच वेळी अष्टमी तिथीला जन्म घेण्यामागेही एक कारण होते आणि ते म्हणजे अष्टमी तिथी हे शक्तीचे प्रतीक आहे. याच शक्तीमुळे भगवान विष्णू संपूर्ण विश्व चालवत होते. तर श्रीकृष्ण शक्तिशाली, आत्मकेंद्रित व परब्रह्मस्वरूप आहेत. म्हणून त्यांचा जन्म अष्टमीला झाला. असे म्हणतात की, रात्री चंद्र उगवला आणि त्यांचा जन्म झाला, यावेळी त्यांचे सर्व पूर्वजही उपस्थित होते.

एवढेच नाही, तर चंद्रदेवांची इच्छा होती की, भगवान श्री हरी विष्णू माझ्या कुटुंबात कृष्णाच्या रूपात जन्माला यावे आणि मला त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडावे. पौराणिक कथेनुसार कृष्णाच्या जन्माच्या वेळी पृथ्वीपासून आकाशापर्यंत संपूर्ण वातावरण सकारात्मक झाले होते. यावेळी नियोजनपूर्वक श्रीकृष्णाने मथुरेत अवतार घेतला होता. यावेळी देव-देवतांनी शुभ गीते गायली आणि देवाची स्तुती केली. निसर्ग, प्राणी, पक्षी, ऋषी, नपुंसक इत्यादी सर्व नाचू-गाऊ लागले आणि देवाच्या जन्माचा आनंद झाला. पृथ्वीपासून इंद्रलोकापर्यंत सर्वत्र देवांच्या आगमनाचे आनंदाचे वातावरण होते, असे म्हणतात. जेव्हा देव पृथ्वीवर जन्माला आला तेव्हा देवांनी स्वर्गातून फुलांचा वर्षाव केला.

Shree Krishna Janmashtami 2023 : नक्की केव्हा साजरी होईल कृष्ण जन्माष्टमी, ६ की ७ सप्टेंबर? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व

श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री होण्यामागे हेही कारण …

कंसाच्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णानेही मध्यरात्रीची निवड केली; जेणेकरून त्याचे वडील त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवू शकतील. म्हणून जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा सर्व तुरुंगांचे दरवाजे उघडले आणि सैनिक गाढ झोपेत गेले. त्यामुळे त्यांचे वडील वसुदेव गोकुळात सुखरूप पोहोचू शकले आणि तुरुंगात असलेल्या पत्नीकडे परत आले. याच कारणामुळे भारतात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मध्यरात्री साजरा केला जातो.