: Famous Shree Krishna Temples in India :  दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्री जन्माष्टमी साजरी केली जाते. यंदा हा सण ६ सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. या उत्सवात प्रामुख्याने भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. या दिवशी अनेक भाविक नवीन वस्त्र परिधान करून भगवान श्रीकृष्णाची विधिवत पूजा करतात. या दिवशी उपवास ठेवला जातो. मध्यरात्री पूजा करून हा उपवास सोडला जातो. हा सण लोक घरोघरी साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या वेळी अनेक ठिकाणी दहीहंडीचा सोहळा आयोजित केला जातो. पण, तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचा खरा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही भारतातील या प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊ शकता.

श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, अशी आख्यायिका प्रचलित आहे. या ठिकाणचे भगवान श्रीकृष्णाचे मंदिर हिंदू धर्मातील पवित्र स्थान मानले जाते. या ठिकाणी दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मोठा उत्सव पाहायला मिळतो. बरेच दिवस आधी या ठिकाणी उत्सवाला सुरुवात होते. यावेळी लहान मुले राधा-कृष्णाच्या रूपात तयार होतात. याच मंदिराजवळ तुम्ही द्वारकाधीश मंदिर आणि राधा-वल्लभ मंदिर बघायला जाऊ शकता.

priyanka Gandhi
Priyanka Gandhi : भावाला दिलेलं चॅलेंज बहिणीने पूर्ण केलं; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रियांका गांधींचं मोदी-शाहांना प्रतिआव्हान
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
rohit sharma ritika sajdeh blessed with a baby boy Posts Goes Viral on Social Media
Rohit Sharma Blessed with Boy: ज्युनियर हिटमॅन, रोहित शर्माला मुलगा झाला? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; पोस्टचा महापूर
guru and shukra yuti | Gaj Lakshmi Rajyog
Gaj Lakshmi Rajyog : मिथुन राशीमध्ये १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, या तीन राशींचे नशीब चमकणार, होणार आकस्मिक धनलाभ
Malavya Rajyog
शुक्र निर्माण करणार मालव्य राजयोग! २०२५ मध्ये ‘या’ राशींचे नशीब पलटणार, करिअरमध्ये यशासह मिळणार अपार धन
actor himansh kohli wedding photos out
बॉलीवूड अभिनेत्याने मंदिरात साधेपणाने केलं अरेंज मॅरेज; लग्नातील फोटो आले समोर

Shri Krishna Janmashtami 2023 : … म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मध्यरात्री साजरा केला जातो; जाणून घ्या रंजक कथा

बाके बिहारी मंदिर, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे बाके बिहारी हे श्रीकृष्णाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या ठिकाणच्या श्रीकृष्णाच्या मनमोहक मूर्तीचे दर्शन घेऊन भाविक तृप्त होतात. फक्त देशातूनच नाही तर परदेशातूनही भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. याच ठिकाणी असलेली रंगनाथ मंदिर, इस्कॉन मंदिर व राधा-रमण ही मंदिरे बघण्यासारखी आहेत.

द्वारकाधीश मंदिर, गुजरात

भारताच्या प्राचीन कथांमध्ये गुजरातच्या द्वारकाधीश मंदिराला महत्त्वाचे स्थान आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात द्वारकाधीशाच्या रूपातील कृष्णमूर्तीची पूजा केली जाते. या ठिकाणी दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी फार उत्साहात साजरी केली जाते. द्वारकाधीश मंदिरसह तुम्हाला या ठिकाणी रुक्मिणी मंदिर व इस्कॉन मंदिरही पाहता येते.

भालका मंदिर, गुजरात

गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये असलेले भालका तीर्थ हे भगवान श्रीकृष्णाच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराविषयी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. भालका तीर्थमध्ये दर्शन घेतल्यानंतर सर्व पापांमधून मुक्ती मिळते, असा भाविकांचा समज आहे. त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भारतासह परदेशातून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.