Malavya And Gajkesari Rajyog 2025: वैदिक ज्योतिषात पंचमहापुरुष आणि गजकेसरी राजयोगाचा उल्लेख आहे. हा योग कुंडलीत असेल, तर व्यक्तीला सर्व सुखे प्राप्त होतात. तसेच व्यक्ती खूप श्रीमंत बनते, असे मानले जाते. यंदा ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी अतिशय शुभ मानला गेलेला गजकेसरी योग आणि मालव्य योग अशा प्रकारचे पुण्य फलदायी राजयोग जुळून येत आहेत. चंद्र व गुरूच्या युतीने गजकेसरी राजयोग तयार होईल आणि शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशीत प्रवेश करताच मालव्य राजयोग तयार होईल. अशा परिस्थितीत या दोन राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. त्याव्यतिरिक्त या राशींना अचानक आर्थिक लाभासह मोठा मान-सन्मानही मिळण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊ या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ?
वृषभ
गजकेसरी आणि मालव्य राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार चांगले परिणाम मिळू शकतात. गुंतवलेल्या पैशातही फायदा होऊ शकतो. नोकरदार वर्गातील लोकांच्या कामाची चांगली प्रशंसा होऊ शकते. तुमच्या संचित संपत्तीतही वाढ होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही काही सकारात्मक बदल होऊ शकतात. तुमच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू शकते. या राशीच्या लोकांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
धनू
गजकेसरी आणि मालव्य राजयोग वृषभ धनू राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहेत. जे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत आहेत, त्यांना चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन डील मिळण्याची शक्यता आहे. तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे होतील. तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला मोठा नफा होऊ शकतो. आरोग्याच्या सर्व तक्रारी दूर होऊ शकतात.
कुंभ
गजकेसरी आणि मालव्य राजयोगाची निर्मिती कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम घेऊन येणारी ठरू शकते. या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन सोर्स उपलब्ध होऊ शकतात. व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार असून तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. तुमचं आरोग्य चांगले राहू शकते. तसेच ज्या लोकांचे काम किंवा व्यवसाय प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेटशी संबंधित आहे, त्यांना फायदा होऊ शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)