वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. तर काही ग्रह वक्री आणि मार्गी होतात. कधी कधी काही ग्रहांच्या युतीमुळे काही योगही जुळून येतात. आता भौतिक सुखांचा कारक असलेल्या शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहेत, तर केतू आधीपासूनच कन्या राशीत विराजमान आहेत. ज्यामुळे केतू आणि शुक्रदेवाची कन्या राशीत युती होणार आहे. ही युती दहा वर्षांनंतर झाल्याने काही राशींना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
मेष राशी
मेष राशीच्या लोकांना शुक्र आणि केतुच्या युतीमुळे जीवनात मोठा फायदा होऊ शकतो. नवी नोकरी अथवा नोकरीमध्ये प्रमोशन या मिळण्याची शक्यता आहे. या काळात पैसे येण्याचे काही नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. चांगल्या आर्थिक संधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात. तुमच्या व्यवसायाला गती मिळून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा: दिवाळीनंतर ४ दिवसांनी ‘या’ राशी होतील बलाढ्य धनवान? सूर्य राशी परिवर्तन करताच मिळू शकते नशिबाला कलाटणी)
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि केतुच्या युतीमुळे सर्वोत्तम काळ सुरु होऊ शकतो. नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. हाती घेतलेले काम पूर्ण होऊन प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले काम मार्गी लागून मनाप्रमाणे यश मिळण्याची शक्यता आहे. घरात सुख चैतन्य लाभण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी लाभण्याची शक्यता आहे.
कन्या राशी
शुक्र आणि केतुच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. नवीन प्रकल्पात यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. तुमच्या कठोर परिश्रमाचे या काळात फळ मिळण्याची शक्यता आहे. या काळात मालमत्ता खरेदी करु शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)