ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाच्या राशीत बदल होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. २०२२ या वर्षात अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मंगळाने १६ जानेवारील धनु राशीत प्रवेश केला आहे. या राशीत मंगळ ग्रह ४२ दिवस असणार आहे. या राशीत शुक्र आधीपासूनच आहे. धनु राशीमध्ये मंगळाच्या प्रवेशाने अनेक लोकांच्या जीवनात शुभ बदल घडतील आणि धनप्राप्तीचे योगही वाढतील. मंगळ आणि शुक्राच्या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. पण चार राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहेत. चला जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत.
मेष: या राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शुक्राचा योग शुभ सिद्ध होईल. शुक्राच्या प्रभावामुळे धन, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तसेच गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल. याशिवाय या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे परिवर्तन शुभ राहील. मेष राशीचे राज्य मंगळ ग्रहावर आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना मंगळाची पूर्ण कृपा मिळणार आहे. या दरम्यान तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल आणि तुम्ही व्यवसायातही पैसे कमवू शकाल.
कुंभ: मंगळाचे संक्रमण तुमच्या लाभाच्या घरात असेल, त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना करिअर-व्यवसायात या काळात सुखद परिणाम मिळू शकतात. जर तुम्ही पूर्वी कुठे गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यातून नफा मिळू शकतो. या काळात कोणतीही दडपलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबीयांसह व्यवसाय करण्याचे स्वप्नही पूर्ण होण्याची शक्यता आहे. याशिवाय वैवाहिक जीवन आनंदी राहील. याशिवाय शत्रू आणि विरोधक पराभूत होतील.
Astrology: शनिदेव ३३ दिवसांसाठी होणार अस्त; चार राशींच्या अडचणीत होणार वाढ
धनु: मंगळ आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. यावेळी, मंगळ तुमच्यामध्ये अपार ऊर्जा शक्ती वाढवेल, निर्णय घेण्याची क्षमता विस्तारेल. आरोग्य उत्तम राहील. भावनेतून घेतलेला निर्णय हानीकारक ठरू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. सरकारी शक्तीचे पूर्ण सहकार्य असेल. निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्या दृष्टीनेही ग्रह संक्रमण अनुकूल राहील.
मिथुन: 2022 मध्ये मंगळाचा पहिला राशी बदल लाभाच्या दृष्टीकोनातून शुभ राहील. मंगळ ग्रहाने धनु राशीत प्रवेश केल्याने धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीमध्ये यश आणि प्रसिद्धी मिळेल. मंगळ संक्रमण काळात उत्पन्न वाढेल. याशिवाय वैवाहिक जीवन आनंदी राहील. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.