Shukra And Rahu Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. यावेळी, होळीच्या अवघ्या चार दिवसांनी म्हणजेच १२ मार्चला शुक्र आणि राहूचा संयोग मेष राशीत तयार होणार आहे, ६ एप्रिल २०२३ पर्यंत दोन्ही ग्रह एकत्र राहतील. ज्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसेल. परंतु ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी या काळात अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि राहूचा संयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण ही युती तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात तयार होणार आहे. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला वेळोवेळी आर्थिक लाभही मिळू शकतात. यासोबतच याकाळात तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. परंतु शनिची साडेसती तुमच्यावर सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत समस्या असू शकतात.

तूळ राशी

राहू आणि शुक्राची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीच्या सातव्या स्थानावर तयार होत आहे. जे वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे अर्थ मानला जातो. म्हणूनच यावेळी तुमचे तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. तसेच भागीदारीच्या कामात चांगला फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात प्रेम राहील. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. यासोबतच कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.

( हे ही वाचा: १२ मार्चपर्यंत ‘या’ राशी होऊ शकतात गडगंज श्रीमंत; शुक्रदेव वर्षभर देणार प्रचंड धनलाभाची संधी)

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी राहू आणि शुक्राची जोडी फायदेशीर ठरू शकते. कारण ही युती तुमच्या पारगमन कुंडलीच्या ११व्या घरात होत आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. त्यामुळे पूर्वी केलेल्या कामाचाही यावेळी फायदा होऊ शकतो. यासोबतच तुम्हाला आर्थिक आणि व्यवसायात फायदा होईल. तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे फायदेही तुम्हाला मिळतील. तसेच, यावेळी व्यवसाय करार निश्चित केला जाऊ शकतो, ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याचवेळी शेअर्समध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra and rahu yuti will make after holi these zodiac sign can get huge amount of money gps