राक्षसांचा स्वामी मानला जाणार शुक्र ठराविक कालावधीनंतर त्याचे राशी बदलतो. शुक्राच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. अशा स्थितीत शुक्र वक्री आणि मार्ही असण्याबरोबर अस्त होणार आहे वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी०७:०० वाजता शुक्र मेष राशीत अस्त करेल. शुक्र अस्तामुळे शुभ आणि मंगल कार्य करण्यास बंदी आहे. यानंतर शुक्राच्या उदयानंतरच पुन्हा लग्न संमारंभ सुरू होतील. शुक्र ग्रहाच्या अस्तामुळे सर्व राशींच्या जीवनावरील सकारात्मक प्रभाव लक्षणीय प्रमाणात कमी होतो, कारण हा ग्रह प्रेम संबंध आणि सुखसोयींशी जोडलेला दिसतो. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना शुक्राच्या अस्तामुळे फायदा होईल, तर इतर राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया शुक्र ग्रहाच्या अस्तामुळे कोणत्या राशींना अधिक फायदे होतील…
मेष
ही राशि शुक्राच्या बारव्या घरात आहे. त्याचप्रमाणे या राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळू शकतो. कुटुंबासह चांगला वेळ घालवता येईल. अविवाहित लोकांना एखादी व्यक्ती आवडू शकते. मेष राशीच्या लोकांना आपल्या भावनां चागल्या प्रकारे व्यक्त करू शकतात. करिअर बाबत सांगायचे झाले तर आपले ध्येय साध्य करण्यासाठी सक्षम असू शकतात. व्यवसायामध्ये देखील फायदा होण्याची पूर्ण शकत्य आहे. या राशीचे लोक लग्जरी लाईफ जगू शकतात. अचानक धनलाभ होऊ शकतो.
मिथुन
या राशीच्या लोकांना शुक्र अस्त होण्याचा फायदा होऊ शकतो. शुक्राच्या मेष राशीत प्रवेश झाल्यामुळे या राशीवर खूप जास्त प्रभाव पडला आहे. कारण येथे आधीपासूनच गुर ग्रह विराजमान आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांवर गुरुची कृपा होणार आहे. आपल्या मित्र आणि कुटुंबासह कोणत्याही ट्रिपचा प्लॅन बनवू शकता. त्याचबरोबर नव्या लोकांचे भेटी -घाटी वाढू शकतात. पण या गोष्टीची काळजी घ्या की कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. व्यवसाय आणि नवीन प्रकल्पातून तुम्हाला खूप फायदा होईल.
हेही वाचा – Numerology: ‘या’ जन्मतारखेचे लोक असतात धाडसी आणि निर्भयी! मंगळाच्या कृपेने या क्षेत्रात कमावतात नाव
कन्या
शुक्र अस्त होण्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. काहीतरी वेगळे काम करू शकता. आपल्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये यश मिळू शकते. मित्राबरोबर चांगला वेळ घालवता येऊ शकतो. तसेच आयुष्यात प्रेम करणारी व्यक्ती येऊ शकते. पार्टनपसह रोमँटिक डेटवर जाऊ शकता. करिअरबाबत सांगायचे झाले तर नवीन संधी मिळू शकते. आज स्वत:च व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर या काळात नक्की सुरू करू शकता. मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंब आणि मित्रासर चांगला वेळ घालवू शकता.