Shukra Chadra Yuti in Kark 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा ठराविक वेळेवर राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. या ग्रह मार्गक्रमणांमुळे अनेकदा शुभ-अशुभ राजयोग तयार होत असतात. चंद्र हा इतर ग्रहांच्या तुलनेने सर्वाधिक जलद गतीने भ्रमण करतो. काल म्हणजेच २० जूनला रात्री चंद्राने कर्क राशीत गोचर केले आहे. कर्क राशीत अगोदरच असलेल्या शुक्र ग्रहासह चंद्राची युती तयार होत आहे ज्यातून कलात्मक राजयोग निर्माण होत आहे. कर्क राशीतील या राजयोगाचा प्रभाव तीन राशींवर अत्यंत शुभ दिसून येऊ शकतो. या राशींना धनलाभासह एखादी मोठी संधी सुद्धा प्राप्त होऊ शकते, या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना कशाप्रकारच्या लाभाचे योग आहेत हे सुद्धा पाहूया …

शुक्र-चंद्र युती ‘या’ राशींना देणार अपार धनलाभ?

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

मेष राशीच्या मंडळींसाठी कलात्मक राजयोग हा अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. चंद्राची शीतलता व शुक्राचे वैभव यामुळे तुमच्या राशीला चहूबाजूंनी लाभाची चिन्हे आहेत. आपल्या राशीला येत्या काही दिवसांमध्ये मोठा मान- सन्मान व धन संपत्ती लाभू शकते. नवीन वाहन खरेदीची शक्यताआहे . आपल्याला येत्या काळात काही महत्त्वाच्या ओळखी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला नोकरी व निवासासाठी मोठा फायदा होऊ शकतो. आपल्याला कुटुंबाशी संबंधित काही कठीण पण महत्त्वाचे नियम घ्यावे लागू शकतात.

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

चंद्र शुक्र युती आपल्याला कर्म भावी प्रभावी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मोठी प्रगती करता येऊ शकते. आपल्या जबाबदाऱ्या वाढू शकतात ज्यामुळे काहीसा थकवा जाणवू शकतो. मात्र हेच काम आपल्या भविष्यातील लाभाची सुरुवातठरू शकतात . तुम्हाला नव्याने आयुष्याची ओळख होऊ शकते. आपली लोकप्रियता वाढू शकते. घरांबाबत एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा<< १८ महिन्यांनी मायावी केतूचे गोचर, ‘या’ राशींना अचानक मोठा धनलाभ होणार? तुमची रास यात आहे का बघा

वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)

वृश्चिक राशीसाठी सुद्धा कलात्‍मक योग खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. तुमची अडकून पडलेली कामे मार्गी लागू शकतात तसेच नव्या कामाचा वेग वाढू शकतो. तुम्हाला आई वडिलांची भक्कम साथ लाभू शकते ज्यामुळे तुम्हाला एखादा आयुष्य बदलणारा निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. घरात एखादे मंगलकार्य योजले जाऊ शकते. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून मोठा धनलाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)