Venus Transit 2022: अंतराळात फिरणारे सर्व नऊ ग्रह वारंवार राशिचक्र बदलत राहतात. यामुळे त्यांची स्थिती आणि हालचाल वेळोवेळी बदलत राहते. सुखाचा स्वामी म्हटल्या जाणार्या शुक्राचा सिंह राशीत ३१ ऑगस्टला प्रवेश झाला आहे. ग्रहांचा राजा सूर्य आधीच या राशीत बसला आहे. हे दोन प्रमुख ग्रह एकाच राशीत आल्याने अनेक राशींना फायदा होतो, पण अशा काही राशी आहेत ज्यांना खूप काळजी घ्यावी लागते. दोन्ही ग्रहांच्या संयोगाचा या ५ राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल, ज्यामुळे त्यांना आर्थिक संकट तसेच आजारपण आणि सामाजिक प्रतिष्ठा हानीचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया त्या ५ राशी कोणत्या आहेत.
आर्थिक स्थिती बिकट असू शकते
कन्या राशी (Virgo)
या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिकट असू शकते. त्यांना खर्चावर नियंत्रण ठेवून उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर भर द्यावा लागतो. तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही वेळ योग्य नाही. पैशाच्या कमतरतेमुळे घरातील अनेक महत्त्वाची कामे थांबू शकतात, त्यामुळे ग्रह-संकटाची परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत हा कठीण काळ संयमाने पार करावा लागेल.
( हे ही वाचा: २०२२ चे शेवटचे चार महिने ‘या’ राशींसाठी असतील खास; मिळेल अमाप पैसा आणि प्रतिष्ठा)
नोकरी-व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागेल
मिथुन राशी (Gemini)
या राशीच्या लोकांसाठी नोकरी-व्यवसायात कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑफिसमध्ये अनावश्यक कामाच्या दबावाला सामोरे जावे लागेल. व्यवसायात नुकसान होऊ शकते, ज्याच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत भाऊ-बहीण एकमेकांना मदत करून अशा संकटांतून बाहेर पडू शकतात.
सामाजिक प्रतिष्ठा कमी होऊ शकते
मीन राशी( Pisces)
सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांना अनेक स्तरांवर त्रास सहन करावा लागू शकतो. अशाने त्यांची सामाजिक स्थिती कमी होऊ शकते. मुलाच्या बाजूने त्यांना निराशेचा सामना करावा लागू शकतो. जुनाट आजार पुन्हा त्रास देऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबाचा खर्च वाढेल. मुलांच्या शिक्षणासाठी खर्चाची व्यवस्था करण्यात अडचणी येण्याची शक्यता दिसतेय.
( हे ही वाचा: शनिदेव स्वतःच्या राशीत विराजमान असतील; ‘या’ ३ राशींचे नशीब अचानक बदलणार)
करिअरमध्ये वाईट बातमी मिळू शकते
मकर राशी
सिंह राशीत शुक्र आणि सूर्य एकत्र असल्याने या राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला करिअरशी संबंधित काही वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला धक्का बसेल. तुमची प्रमोशन थांबू शकते आणि नोकरीत अनेक प्रोजेक्ट हाताशी जाऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला खूप संयमाने काम करावे लागेल आणि कोणावरही राग काढणे टाळावे लागेल.
कोणताही नवीन आजार आरोग्याला घेरू शकतो
कर्क राशी
या राशीच्या लोकांना आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबातील सदस्याला अचानक एखादा नवीन आजार घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे औषधे आणि उपचारांवर खूप खर्च येण्याची शक्यता आहे. तुमची अनेक कामे अचानक बिघडू शकतात. कोर्ट-कचेऱ्यालाही सामोरे जावे लागू शकते. तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक गोष्टी खाणे टाळा.