ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह आज म्हणजेच २७ एप्रिल २०२२ रोजी मीन राशीत प्रवेश करेल. शुक्र हा भौतिक सुख, प्रणय आणि संपत्ती देणारा ग्रह आहे. शुक्र शुभ असल्याने आर्थिक सुबत्ता येते, आरामदायी जीवन मिळते. मीन राशीत शुक्राचा प्रवेश काहींसाठी शुभ तर काहींसाठी वाईट परिणाम देऊ शकतो. जाणून घेऊया शुक्राचा मीन राशीतील प्रवेश इतर राशींवर कसा परिणाम करेल.
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण शुभ आहे. जीवनात सुख-समृद्धी वाढेल. व्यापाऱ्यांचा नफा वाढेल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते. घर-गाडी खरेदीची शक्यता आहे.
वृषभ : वृषभ राशीचे जे लोक व्यवसाय करतात, त्यांना फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांनी सध्या नोकरी नये. गुंतवणूक टाळा. तब्येतीत चढ-उतार जाणवेल.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. ध्येयाचा पाठलाग करा, यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
कर्क : पदोन्नती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही छान काम कराल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. गुंतवणूक करू शकता. कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी बाहेर जाण्याची शक्यता आहे.
सिंह : करिअरसाठी वेळ योग्य आहे, तरीही संयमाने काम करा. काही कामं अडकू शकतात. विनाकारण पैसे वाया घालवू नका, हुशारीने खर्च करा. भागीदारी फायदेशीर ठरू शकते.
कन्या : कन्या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. कामात यश मिळेल. तुम्हाला प्रशंसा मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. आरोग्याची काळजी घ्या. अविवाहित लोक विवाह करू शकतात.
तूळ : उत्पन्न वाढेल पण काही गोष्टी आपल्याला तेव्हाच मिळतात जेव्हा आपण त्यांची मागणी करतो. त्यामुळे तुमची मागणी नम्रपणे ठेवा, फायदा होईल. तुम्ही अनावश्यक समस्यांमध्ये अडकू शकता. दुखापत होऊ शकते. विवाहित लोकांचे जीवन चांगले राहील.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना हा काळ मान-सन्मान-पैसा सर्व काही देईल. आत्मविश्वास उच्च राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला ठरेल. गुंतवणूक टाळावी.
धनु : करिअर आणि व्यवसायात सुधारणा होईल. उत्पन्न वाढेल. तुम्ही अशा गोष्टींवर खर्च करू शकाल, ज्यासाठी तुम्ही आतापर्यंत फक्त योजना करत होता. नोकरी बदलण्याची शक्यताही निर्माण होत आहे.
मकर : उत्पन्न वाढेल. धनलाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कर्जातून मुक्ती मिळेल. पदोन्नती मिळू शकते. जीवनसाथीसोबतचे नाते मजबूत होईल.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकाल. लव्ह लाईफसाठी काळ चांगला राहील. कोणतेही यश मिळवता येईल.
मीन : मीन राशीचे लोक चांगले काम करतील आणि त्यांना त्याचे फळही मिळेल. नवीन नोकरी मिळू शकते. विशेषत: सरकारी नोकरी करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. नम्रतेने अनेक गोष्टी सहज करता येतील.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)