Shukra Gochar 2022: या महिन्यात शुक्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह २४ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ८.५१ वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचे हे संक्रमण अनेक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार शुक्र ग्रह भौतिक सुखांचा कारक मानला जातो. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत स्थितीत असेल तर त्याला सर्व प्रकारचे सुख मिळू शकते. त्याच वेळी, असेही मानले जाते की जर त्याचा प्रभाव कुंडलीमध्ये प्रतिकूल असेल तर त्याला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया अशा चार राशींबद्दल ज्यासाठी या काळात शुक्राचे हे संक्रमण फायदेशीर ठरू शकते.

सिंह राशी

या काळात या राशीच्या लोकांना अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. या काळात या राशीचे लोकं तणावमुक्त राहतील. तसंच व्यवसायातही चांगले यश मिळू शकते आणि त्यामुळे उत्पन्न वाढू शकते.

(हे ही वाचा: Mangal Gochar 2022: पुढील २५ दिवस ‘या’ ३ राशींसाठी असू शकतात खूप भाग्यशाली; जाणून घ्या तुमची राशी काय सांगते)

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे . आर्थिक वृद्धी होऊ शकते आणि त्याच वेळी गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ असू शकते. काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासूनही सुटका होऊ शकते. करिअरमध्येही तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थानिकांना चांगले निकाल मिळू शकतात.

मिथुन राशी

मिथुन राशीला जमिनीशी संबंधित लाभ होऊ शकतात. तसेच, चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मान-सन्मानातही वाढ होऊ शकते. आजाराशी संबंधित समस्यांवरही मात करता येते. नोकरीच्या ठिकाणीही यशाची संधी मिळू शकते.

( हे ही वाचा: २ ऑक्टोबर पर्यंत बुध ग्रह उलट दिशेने फिरेल; ‘या’ ३ राशींना आर्थिक लाभासह भाग्योदयाचे प्रबळ योग)

कर्क राशी

हा काळ आर्थिक दृष्टिकोनातून चांगला असू शकतो. विविध माध्यमातून पैसे मिळू शकतात, ज्यामुळे उत्पन्न वाढू शकते. कर्जाशी संबंधित समस्या बऱ्याच अंशी सुटू शकतात. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. करिअरमध्ये चांगला वेळ येण्याची शक्यता आहे आणि पदोन्नती देखील होऊ शकते.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader