वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक अंतराने गोचर करुन शुभ आणि अशुभ योग तयार करतात, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता नोव्हेंबर महिन्यात शुक्र स्वतःची राशी तूळमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. या राजयोग तयार झाल्यामुळे ३ राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाची विशेष कृपा होऊ शकते. ज्यामुळे या राशींच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ रास (Taurus Zodiac)

मालव्य राजयोग वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र तुमच्या राशीचा स्वामी आहे. तसेच, शुक्र ग्रह तुमच्या कुंडलीच्या सहाव्या स्थानी प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारु शकते. तसेच तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांबरोबरचे संबंध सुधारु शकतात. तुमच्या जोडीदाराच्या सल्लाने व्यवसायात जे काही काम कराल त्यात यश मिळू मिळण्याची शक्यता आहे. तर पार्टनरशिपमध्ये चांगला फायदा होऊ शकतो.

मकर रास (Makar Zodiac)

मालव्य राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. शुक्र ग्रह तुमच्या राशीतून दहाव्या स्थानी प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला व्यवसायात यश मिळू शकते. आर्थिक लाभासह कामाच्या ठिकाणीही तुमची प्रगती होऊ शकते. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो तर बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात.

हेही वाचा- मंगळाचा शुक्राच्या राशीत प्रवेश होताच ‘या’ राशींना अचानक पैसा मिळणार? प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळण्याची शक्यता

कुंभ रास (Kumbh Zodiac)

मालव्य राजयोगाची निर्मिती कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून नवव्या स्थानी प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे नशीब तुम्हाला साथ देऊ शकते. या काळात तुम्ही लहान किंवा मोठ्या सहली करू शकता, ज्याचा फायदा होऊ शकतो. व्यवसायात मोठ्या प्रमाणात पैसा मिळू शकतो. तुमच्या वैवाहिक जीनात गोडवा निर्माण होऊ शकतो. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला ठरण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)