Shukra Gochar 2023: धनाचा दाता शुक्र अनेक काही काळानंतर राशी परिवर्तन करतो. अशातच आता शुक्र ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी सूर्य सिंह राशीतून बाहेर पडून बुधाची राशी कन्यामध्ये प्रवेश करणार आहे. तसेच तो त्या राशीत २९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत राहणार आहे. शुक्राचे हे गोचर प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करू शकते. शुक्र हा सुख, शांती, विलास, आकर्षण, सौंदर्य आणि प्रेमाचा कारक मानला जातो. शुक्र ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्यामुळे कोणत्या राशींना विशेष लाभ होऊ शकतो ते जाणून घेऊ या.

कर्क रास (Cancer Zodiac)

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

कर्क राशीच्या तिसऱ्या स्थानी शुक्र गोचर करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रगतीबरोबर नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. अनेक दिवसांपासून खूप प्रयत्न करूनही ज्या कामात यश मिळत नव्हते, त्या कामातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये तुम्हाला अधिक फायदे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही मोठे यश मिळू शकते. व्यवसायात भरघोस नफा मिळवण्याची इच्छा शुक्राच्या गोचर कालावधीत पूर्ण होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात.

कन्या रास (Kanya Zodiac)

या राशीच्या पहिल्या स्थानी शुक्र गोचर करणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. नशिबाने साथ दिल्यास प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करु शकता. नोकरदारांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल. यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळण्यासह काही नवीन जबाबदारीही मिळू शकते. पैशाच्या बाबतीत तुम्हाला लाभ मिळू शकतो. मित्र आणि कुटुंबीयांच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभासह व्यवसायात भरघोस यश मिळू शकते.

हेही वाचा- रुचक राजयोग बनताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? मंगळाच्या कृपेने अचानक धनलाभ होण्याची शक्यता

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीत शुक्राचे अकराव्या स्थानी गोचर होत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. नोकरीत चांगले परिणाम मिळू शकतात. करिअरमध्येही काही चांगले बदल होऊ शकतात. नोकरीतील बदलामुळे तुम्हाला काही प्रवास करावा लागू शकतो. या काळात व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकते. तसेच तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader