Shukra Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या कालावधीनुसार राशीचक्रात भ्रमण करत असतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी एक ठरावीक कालावधी असतो. मात्र काही ग्रह दीर्घ कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहांची स्थिती महत्त्वाची असते. शुक्र ग्रह सुख वैभव, आरामदायी जीवन आणि भौतिक सुखांचा कारक आहे. त्यामुळे शुक्राची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. सध्या शुक्र ग्रह सिंह राशीत असून नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कन्या राशीत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे काही राशींना फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

वृषभ राशी

या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर लाभदायी ठरु शकतो. या राशीतील मंडळींना करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या करत असलेल्या नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ मिळू शकते. तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. जुन्या आजारातून या काळात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Marathi actress Pooja Sawant parents visit their new home in Australia for the first time
Video: पूजा सावंतच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील नव्या घराला दिली भेट, लेकीचं प्रशस्त घर पाहून होती ‘ही’ प्रतिक्रिया
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

(हे ही वाचा : पुढील ३० दिवसानंतर शनिदेव मार्गी होताच ‘या’ चार राशींना देणार अमाप पैसा? माता लक्ष्मीच्या कृपेने घरात नांदू शकते सुख-समृद्धी )

मिथुन राशी

शुक्र गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकतो. नोकरीत पदोन्नती, फायद्याचे दिवस, अभ्यासात यश, सन्मान मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ समस्या दूर होऊ शकतात. मालमत्तेच्या गुंतवणुकीतून चांगला नफा, मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नफा मिळू शकतो, आकस्मिक धनलाभ होऊन नात्यात गोडवा येऊ शकतो.

कन्या राशी

शुक्रदेव कन्या राशीत गोचर करत असल्याने या राशीतील लोकांसाठी सुखाचे दिवस येऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होऊ शकतात. आर्थिक मिळकतीचे नवे मार्ग वाढू शकतात. प्रेमाची साथ लाभल्याने मानसिक ताण दूर होऊ शकतात. ज्या गोष्टी मिळवण्यासाठी मेहनत घ्याल त्या यशस्वी होऊ शकतात. वडीलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता असून मोठा धनलाभ होऊ शकतो. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader