Shukra Gochar In Tula: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. नवग्रहांमध्ये शुक्र ग्रहाला धन, वैभव, आकर्षण, प्रेम आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. शुक्राच्या राशी परिवर्तनाचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ परिणाम पाहायला मिळतो. तसेच ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह १८ सप्टेंबर रोजी त्याची मूळ त्रिकोण राशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीन राशींना शुक्र करणार मालामाल

मेष

मेष राशीत शुक्र सातव्या घरात राहणार असून याचा प्रभाव मेष राशीसाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असेल. बँक बँलन्स वाढेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. करिअरमध्ये यश मिळेल. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. फक्त अतिआत्मविश्वास बाळगू नका. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आरोग्य चांगले राहील.

वृषभ

शुक्र वृषभ राशीच्या सहाव्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र चांगले फळ देणारा ठरेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आनंदी वार्ता कानी पडतील. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. करिअरमध्ये चांगले यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. जोडीदारबरोबर आनंदी क्षण व्यतीत कराल. मोठी जबाबदाऱ्या सहज पार पाडाल.

हेही वाचा: शनी देणार बक्कळ पैसा; मूळ त्रिकोण राशीतील उपस्थिती ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुख

कर्क

कर्क राशीमध्ये शुक्र अकराव्या घराचा स्वामी असून चौथ्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक चांगले परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. शिक्षणातील अडथळे दूर होतील. आयुष्यात सुख-समृद्धी, भौतिक सुख प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. धार्मिक कार्यात मन रमेल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra gochar 24 after 4 days venus enter in libra persons of these three zodiac signs will get money sap