Shukra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशी वेळेनुसार राशी बदलून अन्य राशीमध्ये प्रवेश करतात. शुक्र धन, आनंद, प्रेम, आकर्षण याचे प्रतीक आहे. शुक्र जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्याचा परिणाम इतर राशींच्या जीवनावर होतो. इतर राशीच्या लोकांची धनसंपत्ती, सुख सुविधा, प्रेमजीवनावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. ७ मार्च ला शुक्र ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जात आहे. शनिची रास कुंभ राशीमध्ये शुक्र ग्रह प्रवेश करणार आहे.जवळपास एक वर्षानंतर शुक्र कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. याचा फायदा राशीचक्रातील तीन राशींना होणार आहे. आज आपण त्या राशींविषयी जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुळ

तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्राचे राशी परिवर्तन तुळ राशीसाठी फायद्याचे ठरू शकते. या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येईल. लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्यात सुख दिसून येईल. प्रेमविवाह करण्याचा योग जुळून येऊ शकतो. या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. जीवनात सुख समृद्ध दिसून येईल.

हेही वाचा : महाशिवरात्रीच्या २४ तास आधी शनी-शुक्र शुक्राची शक्ती वाढणार? ‘या’ राशींना महादेवांच्या कृपेसह गडगंज श्रीमंतीचा संकेत

वृश्चिक

शुक्रचा गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरू शकतो. या लोकांचे नवीन घर, नवीन गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जीवनात सुख समृद्धी नांदेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. करिअरमध्ये सकारात्मक बदलांमुळे तुमची कमाई वाढू शकते. कुटूंबाबरोबर फिरायला जाण्याचा योग जुळून येईल. या लोकांचे आईबरोबरचे नातेसंबंध दृढ होईल. जीवनात सुख दिसून येईल. जोडीदाराबरोबरचे प्रेमसंबंध आणखी दृढ होईल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचे राशी परिवर्तन लाभदायक ठरू शकते. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. ज्यामुळे या लोकांचा बँक बॅलेन्स वाढण्याची शक्यता आहे. या लोकांनी धनसंपत्ती कमावण्याचे नवीन स्त्रोत सापडतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या अडकलेला पैसा परत मिळू शकतो. वैयक्तिक आयुष्यासाठी हा अत्यंत शुभ काळ आहे. या राशीचे लोक प्रत्येक क्षणाचा आनंद घेईन.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra gochar 2024 in kumbh rashi will be lucky for these zodiac signs people get money love happiness and wealth ndj