Shukra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह जवळपास एका वर्षानंतर आपली स्वराशी असलेल्या तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र १८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ४ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र १२ ऑक्टोबरपर्यंत या राशीत विराजमान राहील. तसेच १३ ऑक्टोबर रोजी शुक्र वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल.

शुक्र करणार मालामाल (shukra enter in tula rashi)

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचे तूळ राशीतील राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचे मन धार्मिक कार्यात रमेल. जोडीदार आणि तुमच्या नात्यातील वाद, गैरसमज दूर होतील. पार्टनरसह फिरायला जायचा प्लान कराल. आर्थिक परिस्थितीही उत्तम असेल. आयुष्यात आनंदाचे वातावरण असेल. भौतिक सुखही प्राप्त होईल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना कामात पद-प्रतिष्ठा प्राप्त होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल.

तूळ

तूळ राशीतच शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन होणार असल्याने हे राशी परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ सिद्ध होईल. येत्या काळात तूळ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. लग्न ठरतील.

हेही वाचा: ८५ दिवस शनि देणार पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील शुक्राचे तूळ राशीतील राशी परिवर्तन भाग्यकारक ठरेल. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)