Malavya Rajyog 2024: ज्योतिष शास्त्रानुसार, एप्रिल महिना ग्रह बदलांच्या दृष्टीने खूप खास राहील. एप्रिल महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. ग्रह एका विशिष्ट वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ज्योतिष शास्त्रानुसार या बदलांचा परिणाम प्रत्येक राशीवर कमी-अधिक प्रमाणात होत असतो. आता या आठवड्यात सुखसोयी देणारा शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीचा स्वामी बृहस्पति आहे. मीन राशीत शुक्र गोचरामुळे ‘मालव्य राजयोग’ तयार होईल. हा राजयोग ४ राशींसाठी खूप चांगला सिद्ध होऊ शकतो. या राजयोगाच्या निर्मितीमुळे या राशींना विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ चार राशींना मिळणार बक्कळ पैसा?

वृषभ राशी

मीन राशीतील शुक्र गोचरामुळे तयार झालेला मालव्य राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकतो. या राशीतील लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. यावेळी तुम्ही नवीन वाहनाचे मालक देखील होऊ शकता. व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला ठरु शकतो.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग लाभदायक ठरु शकतो. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. यावेळी तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो.

(हे ही वाचा : जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा )

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग भरपूर फायदे घेऊन येणारा ठरु शकतो. कामात येणारे अडथळे दूर होऊन या राशीतील लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतात.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. वैवाहिक जीवनातील समस्याही दूर होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) 

 

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra gochar 2024 venue will make malavya rajyog these zodiac sign get more money pdb