Shukra Nakshatra Parivartan 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह त्याच्या स्थितीमध्ये बदल करतो. शुक्र ग्रह हा संपत्ती, समृद्धी, भौतिक सुख, आनंद, प्रेम यांचा कारक मानला जातो. कुंडलीत शुक्र ग्रहाच्या बदलामुळे व्यक्तीला यश मिळते. धनाचा दाता शुक्र काही काळानंतर राशी परिवर्तन करतो. ज्योतिष शास्त्रानुसार, आता शुक्रदेव १८ जून २०२४ रोजी मंगळवारी पहाटे ४ वाजून १४ मिनिटांनी आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. २९ जूनपर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. शुक्रदेव नक्षत्र परिवर्तन करत असल्यामुळे काही राशींना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठा आर्थिक लाभ आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात शुक्र नक्षत्र परिवर्तन करताच कोणत्या राशींना फायदा मिळू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींचं नशीब उजळणार, होणार धनलाभ?

मेष राशी

शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. शुक्राचा हा नक्षत्र बदल तुम्हाला घर किंवा वाहन खरेदीचा आनंद देऊ शकतो. तुम्ही नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही अनेक नवीन संधी मिळू शकतात.

(हे ही वाचा: डिसेंबर २०२४ पर्यंत ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? देवगुरुच्या कृपेने बरसणार धन व सुख, तुम्ही आहात का नशीबवान?)

सिंह राशी

शुक्राच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी वाढू शकते. या राशीच्या लोकांची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हे नक्षत्र परिवर्तन खूप फायदेशीर ठरु शकते. तुम्हाला कामातही फायदा होऊ शकते. तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या लवकरच दूर होऊ शकतात. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांना शुक्रदेवाच्या कृपने सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या काळात या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. यासोबतच नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या अविवाहित लोकांचा विवाह लवकरच निश्चित होऊ शकतो. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकते. तसेच याकाळात दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांपासून आराम मिळू शकतो.

मकर राशी

शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मकर राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतो. या काळात मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही व्यवसायात प्रचंड यश मिळवून आर्थिक नफा देखील मिळवू शकता. यश मिळण्यासोबतच तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही गुंतवणूक कराल तर तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)