Shukra Nakshatra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र देवाला भैतिक सुख जसे की, धन, ऐश्वर्य, संपत्ती, यांचं ग्रह मानले गेले आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह हा व्यवस्थित असतो, तेव्हा त्या व्यक्तीचं नशीब सुद्धा साथ देत असतं. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं व्यक्तीमत्व सुद्धा चमकू लागते, अशी मान्यता आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रहाला तूळ आणि वृषभ राशीचा स्वामी ग्रह मानलं जातो. ग्रह ज्या प्रमाणे राशी परिवर्तन करतात त्याचप्रमाणे नक्षत्र परिवर्तन करतात. जेव्हा एखादा ग्रह एखाद्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याचा परिणाम राशी चक्रातील इतर राशींवर दिसून येतो. शुक्र सध्या रोहिणी नक्षत्रात विराजमान आहेत. तर येत्या ७ जून २०२४ रोजी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी शुक्र मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींना जीवनात अपार यश, सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया या नशिबान राशी कोणत्या…
‘या’ राशीच्या लोकांवर होणार पैशांचा पाऊस?
मिथुन राशी
मिथुन राशीच्या मंडळींना शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मोठा फायदा होऊ शकतो. या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतात यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात या लोकांना खूप चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते पूर्ण होऊ शकते. व्यापारी आणि नोकरदारांना खूप फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. समाजात मान सन्मान वाढू शकतो.
(हे ही वाचा: ४२ दिवस ‘या’ राशींच्या उत्पन्नात होईल प्रचंड वाढ? मंगळदेव मजबूत योग घडवून आणताच होऊ शकतात गडगंज श्रीमंत )
कन्या राशी
शुक्रदेवाचे नक्षत्र परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या काळात घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पैसा आणि आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फलदायी ठरु शकते. या काळात कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मजबूत होण्याची शक्यता आहे.
कुंभ राशी
शुक्राचं नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. या राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय भाग्यशाली ठरु शकते. तुम्हाला मोठी डील मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती आणि वाढ होण्याची शक्यता आहे. या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात नवीन घर-कार खरेदी करु शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)