Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, राक्षसांचा गुरू शुक्र हा सर्वांत शुभ ग्रहांपैकी एक मानला जातो, जो विशिष्ट कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. शुक्र ग्रहाला धन, वैभव, सन्मान, आनंद, समृद्धी, विलास, प्रेम व आकर्षणाचा कारक मानले जाते. शुक्र सध्या मीन राशीत आहे. मे महिन्याच्या शेवटी म्हणजे ३१ मे रोजी तो मेष राशीत प्रवेश करील, ज्यामुळे त्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिसून येईल. या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊ….

पंचांगानुसार, धनदाता शुक्र ग्रह ३१ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ४२ वाजता मेष राशीत प्रवेश करील आणि तो २९ जूनपर्यंत या राशीत राहील.

मिथुन (Gemini Zodiac Sign)

शुक्राचा मेष राशीतील प्रवेश मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना मुलांचे सुख मिळू शकते. प्रत्येक कामात मित्र आणि कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. आर्थिक गोष्टीत तुम्हाला फायदे मिळू शकतात. तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता. लव्ह लाईफ चांगले राहणार आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. आरोग्य चांगले राहणार आहे.

तूळ (Libra Zodiac Sign)

शुक्र राशीचा मेष राशीतील प्रवेश तूळ राशीच्या लोकांसाठीही भाग्यवान ठरू शकतो. या राशीच्या लोकांना त्यांच्या मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांनाही भरपूर फायदे मिळू शकतात. नोकरीत बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकाल. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. भागीदारीत केलेल्या व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो. लव्ह लाईफदेखील चांगले राहणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करू शकाल.

कुंभ (Aquarius Zodiac Sign)

शुक्र गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात नोकरीतही तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. नशीब तुमच्या बाजूने असू शकते, ज्यामुळे तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. करिअर क्षेत्रात लक्षणीय विस्तार होऊ शकतो. पगारवाढीबरोबर पदोन्नतीचीही शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असू शकतो. जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल, नातेसंबंधांमध्ये आनंदाचे क्षण येऊ शकतात. आरोग्य चांगले राहील. आत्मविश्वास वाढू शकतो.