Shukra Margi 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, एप्रिल महिना ग्रह परिवर्तनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भौतिक सुख, धन वैभवाचा स्वामी ग्रह शुक्र मार्गी होणार आहे. पण शुक्र मार्गी होणे काही विशेष नाही पण तो आता उच्च स्थितीमध्ये मार्गी होणार आहे. सध्या शुक्र ग्रह मीन राशीमध्ये गोचर करणार आहे. या राशीमध्ये शुक्राचा उच्च प्रभाव देतो. कारण शुक्र आता वक्री होणार आहे. त्यामुळे त्याचा शुभ प्रभाव राशींना मिळत नव्हता. मार्गी झाल्यानंतर शुक्राचा जबरदस्त प्रभाव सर्व राशींना मिळणार पण खास करून तीन राशींचे लोक जास्त फायदेशीर ठरणार आहे. त्यांना धन संपत्ती मिळू शकते.
१३ एप्रिलला होणार मार्गी
सध्या शुक्र मीन राशीमध्ये वक्री स्थितीत विराजमान आहे. १३ एप्रिलरोजी ते मीन राशीमध्ये मार्गी होणार आहे. म्हणजचे सरळ चाल चालणार आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण विशेष करून तीन राशींच्या लोकांवर शुक्राची कृपा अधिक दिसून येईल. त्या तीन राशी कोणत्या, जाणून घेऊ या.
वृषभ राशी
या राशीवर सकारात्मक प्रभाव दिसून येईल. या लोकांना सुख समृद्धीची प्राप्ती होईल. जमीन, संपत्ती आणि वाहन खरेदी करू शकतात आर्थिक स्थिती मजबूत राहीन आणि व्यवसायात नफा मिळेल. पूर्वीपासून अडकलेले धन परत मिळू शकतात. लग्न विवाहातील अडथळे दूर होतील. या लोकांचे सर्व कामे मार्गी लागतील.
कर्क राशी
या राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव दिसून येईल. पैशांचे नवीन स्त्रोत दिसून येईल. जर हे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर हा काळ उत्तम आहे. नोकरीमध्ये पदोन्नती आणि पगारवाढ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी प्रवास करू शकता, जो या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय फायदेशीर ठरू शकतो.
तुळ राशी
या राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव दिसून येईल. करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. विदेशात प्रवास करण्याचा योग जुळून येईल. विद्यार्थी परिक्षेत यश मिळवू शकतात. नोकरी शोधणाऱ्या लोकांना नोकरी मिळू शकते. जुन्या मित्राबरोबर अचानक भेट होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहीन.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)