Venus rashi parivartan in new year 2025: २०२५ साल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २०२५ मध्ये अनेक लहान-मोठ्या ग्रहांच्या हालचालींमध्ये बदल दिसून येतील. २०२५ मध्ये शुक्राची चाल १० वेळा बदल होणार आहेत. शुक्र या वर्षी अनेक वेळा स्वतःच्या राशीत आणि उच्च राशीत प्रवेश करेल. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा ३ राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. तसेच, या राशींच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष राशी (Aries)

शुक्राचे १० वेळा भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. तसेच, जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. तिथे तुमचे आरोग्य सुधारेल. तसेच जे अविवाहित आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. तर नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. पदोन्नतीची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

हेही वाचा – १२ महिन्यांनंतर शुक्र अ्न सुर्याची होणार युती! या राशींचे पलटणार नशीब, करिअर-व्यवसायामध्ये प्रगतीचे योग

वृश्चिक राशि (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्राचे १० वेळा भ्रमण फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नातेसंबंध अधिक दृढ होतील. लव्ह लाईफमध्ये उत्साह वाढेल. या वर्षी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच, तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आयुष्यात कोणीतरी येऊ शकते. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

हेही वाचा – ३ दिवसांनी शनी बदलणार आपली चाल! २०२५मध्ये या राशींच्या लोकांचे नशीब चमकणार, प्रत्येक कामात मिळेल यश

धनु राशी (Sagittarius)

शुक्राचा २० राशींमध्ये होणारा बदल तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचे सुख मिळू शकते. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहलीचे नियोजन देखील करू शकता. जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे. तसेच या काळात कामातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नातेसंबंध अधिक दृढ होतील.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra gochar 2025 venus rashi parivartan in new year 2025 these zodiac sign get more profit snk