Venus Transit in Dhanishta Nakshatra : ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राला शुभ ग्रह मानले जाते. शुक्र वेळोवेळी राशी परिवर्तनाशिवाय नक्षत्र परिवर्तन सुद्धा करतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र या वेळी श्रवण नक्षत्रामध्ये विराजमान आहे आणि २२ डिसेंबर रोजी धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचा थेट परिणाम सर्व राशींवर दिसून येईल पण राशिचक्रातील तीन राशींच्या लोकांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे.
सुख, धन संपत्ती -पैसा, प्रेम, वैवाहिक आयुष्य, याचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन तीन राशींसाठी शुभ ठरणार आहे. त्या तीन राशी कोणत्या, या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (shukra gochar in Dhanishta Nakshatra will be lucky for three zodiac signs and they money and wealth from 22 December)
वृषभ राशी
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन राशिचक्रातील दुसरी राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या लोकांना या नक्षत्र परिवर्तनाचा भरपूर चांगला फायदा होणार आहे. शुक्राच्या या नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम या लोकांच्या आर्थिक स्थितीवर दिसून येईल. जोडीदाराबरोबरची नाराजी दूर होईल. व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारणार. नोकरीच्या ठिकाणी अचानक धन लाभ होऊ शकतो. लव्ह लाइफमध्ये जोडीदाराची साथ मिळेन. विवाहित लोकांना भरपूर आनंद मिळेन.
तुळ राशी
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन तुळ राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते. आर्थिक स्थिती सुधारू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन कामाची सुरूवात होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी शुभ बातमी प्राप्त होईल. प्रॉपर्टीशी संबंधित काम पूर्ण होईल. गुंतवणूकीतून चांगला नफा मिळेन. सुख समृद्धीमध्ये वाढ होईल. कुटुंबातील मोठ्या सदस्यांना धनलाभ होऊ शकतो.
मकर राशी
शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचा लाभ मकर राशीच्या संबंधित लोकांना प्राप्त होईल. धन संपत्तीच्या स्थितीमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसून येईल. पगारात वाढ होईल. व्यवसायात धन वाढेल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची साथ मिळेन. व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. धन संपत्तीविषयी काळजी मिटेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)