Venus Transit 2024: भौतिक सुख व ऐश्वर्याचा कारक मानला जाणारा ग्रह शुक्र आता मिथुन राशीत गोचर करणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिथुन कर्क राशीत गोचर करून स्थिर होतील. कर्क राशीत पोहोचताच तिथे अगोदरच उपस्थित असलेल्या चंद्रासह शुक्राची युती होणार आहे. शुक्र ३० जुलैपर्यंत याच राशीत भ्रमण करणार आहेत. शुक्राचे राशी परिवर्तन काही राशींच्या नशिबाला कलाटणी देणार आहे. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांची कोणत्या रूपात भरभराट होऊ शकते हे पाहूया.

७ जुलैपासून ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

मेष रास

मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुख- सुविधा वाढीस लागतील. घरातील एखाद्या नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीसह मतभेद चालू असतील तर ते संपुष्टात येतील. जोडीदारासह वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल, एखाद्या ठिकाणी सहलीला जाऊ शकाल. या कालावधीत तब्येतीत सुधार होऊ शकतो. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल. ज्या व्यक्तींचा मूळ व्यवसायच रिअल इस्टेटशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. चांगली कमाई करून देणारे व्यवहार होतील.

कर्क रास

शुक गोचर मुळातच कर्क राशीत होत असल्याने या राशीतील मंडळींची चांगली वेळ सुरु होणार आहे. व्यक्तिमत्वात काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. तुमच्या वाणीच्या बळावर आर्थिक कमाईचे मार्ग मोकळे होतील. गुंतवणूक करताना स्वतःचा अभ्यासच कामी येईल, इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहू नका. कुटुंबामध्ये एखादे मंगलकार्य पार पडेल. तुमच्या आयुष्यातील सुख- सुविधा वाढतील, वाहन खरेदी, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक अशा रूपात तुमच्याकडील धनवृद्धीचे स्रोत वाढू शकतात. नोकरीचे ठिकाण व स्वरूप यात बदल होऊ शकतो. अचानक पगारवाढ, बोनस स्वरूपात अनपेक्षित धनलाभ सुद्धा होऊ शकतात.

हे ही वाचा<< ३ जुलै पंचांग: रोहिणी नक्षत्रात आज ‘या’ रूपात मेष ते मीन राशीच्या लोकांना मिळतील आनंदाच्या वार्ता; तुमच्या नशिबात कसं आहे सुख?

तूळ रास

शुक्राचे राशी परिवर्तन तूळ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते कारण या राशीचे स्वामीच मुळात शुक्र आहेत. नोकरी व व्यवसाय करणाऱ्या मंडळींना प्रगतीचे योग आहेत. नवे संपर्क जोडता येतील ज्यामुळे तुम्हाला भविष्यात होणारे लाभ वाढू शकतात. युवा बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. प्रयत्न थांबवू नये. याशिवाय संपूर्ण जुलै महिन्यात शनी, मंगळ आणि शुक्राच्या साथीने परिस्थिती सावरून धरता येईल. विद्यार्थी वर्गाने प्रयत्नात अजिबात कसूर ठेऊ नये. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच भरपूर मेहनत घ्यायची तयारी ठेवल्यास, एकाग्रता राखल्यास यशस्वी व्हाल. नोकरी व्यवसायातील राजकारण डोईजड होऊ देऊ नका. अलिप्त राहून प्रत्येकाला आपली जागा दाखवून द्याल. दीर्घकालीन गुंतवणूक लाभदायक असेल. घराचे कामकाज मार्गी लागण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)