Shukra Gochar Today Astrology: ज्योतिष पंचांगानुसार आज २ मे २०२३ ला शुक्रदेव मिथुन राशीत गोचर करणार आहेत. तर महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजेच ३० मे २०२३ पर्यंत शुक्र बुधाच्या राशीत विराजमान असणार आहे. याचा प्रभाव सर्व १२ राशींवर कमी अधिक प्रमाणात व शुभ- अशुभ स्वरूपात दिसून येणार आहे. वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार अशा पाच राशी आहेत ज्यांच्यावर अत्यंत शुभ प्रभाव दिसून येऊ शकतो. या राशींना आर्थिक, व्यावसायिक लाभाची संधी आहे. शुक्र गोचराच्यादरम्यान नेमक्या कोणत्या राशीला कसा लाभ होणार आहे हे पाहूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपासून ‘या’ राशींच्या नशिबात धनवर्षाव?

मेष रास (Aries Zodiac)

मेष राशीसाठी शुक्राचे गोचर लाभदायक सिद्ध होऊ शकतो. याकाळात कुटुंबासह सुखाचा काळ अनुभवता येऊ शकतो. यावेळी आर्थिक स्रोत व कक्षा रुंदावू शकतात. व्यवसायात नवी नाती तुमच्याशी जोडली जातील. तुमच्या गुंतवणुकीचे प्रमाण वाढवा यावेळी सतर्क राहणे आवश्यक आहे.

मिथुन रास (Gemini Zodiac)

मिथुन राशीसाठी शुक्र गोचर सुखाच्या घटना घेऊ शकतो. तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहात होतात ती लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी झळाळी मिळू शकते. या काळात तुमच्या आर्थिक मिळकतीचे स्रोत व प्रमाण वाढू शकते.

सिंह रास (Leo Zodiac)

२ मे २०२३ पासून शुक्राचे गोचर होणार आहे यावेळी सिंह रास विविध बाजूंनी समृद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला वरिष्ठांची साथ लाभू शकते. तुमच्यावर नव्याने विश्वास टाकला जाईल. विद्यार्थ्यांना या काळात मेहनतीचे फळ मिळू शकते.

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ राशीसाठी हा काळ शुभ व लाभदायक ठरू शकतो. या काळात आहेत, तसेच वाडवडिलांच्या संपत्तीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्रलंबित काळापासून अडकलेले धन पुन्हा मिळू शकते. या काळात तुमचा समाजातील मान- सन्मान वाढीस लागू शकतो.

हे ही वाचा<< शनीदेव होणार वक्री, केंद्र त्रिकोण राजयोग बनल्याने ‘या’ राशींना प्रचंड श्रीमंती? १७ जूनपर्यंत लक्ष्मी देऊ शकते धनलाभ

मीन रास (Pisces Zodiac)

मीन राशीवर सुद्धा शुक्र गोचरचा प्रभाव दिसून येणार आहे. या काळात तुम्हाला भावंडे व आई- वडिलांची साथ मिळाल्याने तुम्ही मोठ्या संकटावर मात करू शकता. वाणीशी संबंधीत काम करणाऱ्यांसाठी ही वेळ लाभाची ठरू शकते. आळस बाजूला ठेवल्यास आपणही माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवू शकता .

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)