Venus Planet Gochar In Tula : २०२४ वर्ष सुरू होण्याआधीच अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. ज्यामध्ये धनाचा दाता शुक्राचा देखील समावेश आहे. शुक्र ३० नोव्हेंबरला तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तुळ राशी ही शुक्र ग्रहाची मूळ त्रिकोण राशी आहे. त्यामुळे शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण ३ राशी अशा आहेत ज्यांच्यावर शुक्रदेवांची विशेष कृपा राहू शकते. तसेच २०२४ वर्षामध्ये या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचा मुळ त्रिकोण राशीत प्रवेश फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून चौथ्या स्थानी भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला सर्व भौतिक सुखांचा लाभ मिळू शकतात. तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करु शकता. तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल देखील होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आईचे सहकार्य मिळू शकते. शुक्राची दृष्टी तुमच्या कर्म स्थानी असल्यामुळे नोकरदारांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकतात. तसेच व्यावसायिकांना चांगला नफा देखील मिळू शकतो.
मेष रास (Aries Zodiac)
शुक्राचा तूळ राशीत प्रवेश तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून सातव्या स्थानी जाणार आहे. त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच भागीदारीच्या कामात तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. शुक्र तुमच्या राशीच्या धन स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- १० वर्षांनंतर केतू आणि शुक्राची कन्या राशीत युती; ‘या’ राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता
कुंभ रास (Kumbh Zodiac)
शुक्राचे गोचर तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून नवव्या स्थानी भ्रमण करणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. या काळात केलेला प्रवास तुम्हाला फायदा देणारा ठरु शकतो. तुमची आर्थिक स्थितीही सुधारु शकते. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. धार्मिक कार्यात ओढ राहू शकते. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठीही हे गोचर शुभ ठरु शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)