ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा विलास, आनंद, आनंद आणि समृद्धी, सर्जनशीलता, प्रेम, विवाह आणि जीवनातील उत्कटतेचा कारक आहे. २७ एप्रिल रोजी होणारे शुक्राचे हे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करणार आहे. आता शुक्र शनिदेवाच्या आवडत्या राशी कुंभ राशीतून गोचर करत आहे. बुधवार २७ एप्रिल २०२२ रोजी शुक्र शनिदेवाच्या कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. हे संक्रमण संध्याकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी होईल. या संक्रमणामुळे तीन राशींना पाठबळ मिळणार आहे, जाणून घेऊयात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र त्यांच्या उत्पन्न, इच्छा आणि लाभाच्या अकराव्या घरात प्रवेश करेल. या संक्रमण काळात उद्दिष्टे पूर्ण होण्याची शक्यता आहे. पैशाच्या दृष्टीनेही काळ अनुकूल राहील. पगारवाढीसोबत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे, तसेच व्यावसायिकांनाही या काळात चांगला नफा मिळू शकेल.

मिथुन: मिथुन राशीसाठी शुक्र त्यांच्या करिअर, क्षेत्र, नाव आणि कीर्तीच्या दहाव्या घरात प्रवेश करेल. परदेशातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात नोकरीच्या चांगल्या संधी, पदोन्नती, पुरस्कार आणि प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूबद्दल बोलायचे झाले तर, या काळात तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीद्वारे पैसे कमवू शकता.

Shani: सात दिवसानंतर शनि बदलणार राशी, अडीच वर्षानंतर तूळ, मिथून राशीला दिलासा

कर्क: कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र त्यांच्या नशिबाच्या नवव्या भावात भ्रमण करत आहे. या संक्रमण काळात स्थानिकांची सर्जनशील क्षमता वाढेल, कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होईल. यासोबतच पगारात किंवा पदोन्नतीतही मिळेल. संक्रमणाचा हा काळ आर्थिकदृष्ट्या सकारात्मक असणार आहे. या काळात तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. या काळात व्यापारी वर्गातील लोकांनाही चांगला फायदा होईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra grah gochar in meen rashi 27 apr 2022 rmt