Kark Shukra Vakri: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, भौतिक सुख, प्रेम, वैभव व धन याचा कारक मानला जाणारा शुक्र येत्या महिन्यात वक्री होणार आहे. शुक्राची ही उलट चाल कर्क राशीत प्रभावी असली तरी याचा प्रभाव १२ राशींवर कमी अधिक प्रमाणात दिसून येणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार २२ जुलै २०२३ ला शुक्र वक्री होणार आहे याचा शुभ प्रभाव तीन राशींवर पाहायला मिळू शकतो. या राशींना प्रचंड मोठया धनलाभाचा व प्रगतीचा योग आहे. भाग्योदय होण्यासह तुम्हाला मानसिक शांतीचा सुद्धा अनुभव घेता येऊ शकतो. शुक्र वक्री होऊन नेमक्या कोणत्या राशीला धन लाभ होऊ शकतो हे पाहूया…

वक्री शुक्र ‘या’ राशींना देणार अपार धन?

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

मेष राशीच्या मंडळींना लाभाची चिन्हे आहेत. या मंडळींना गुंतवणूक, म्युच्युअल फंड्स व शेअर बाजार यातून मोठा धनलाभ होऊ शकतो. आपल्या आयुष्यात लग्जरी ‘राजेशाही’ थाट अनुभवता येऊ शकतो. रिअल इस्टेटमध्ये कार्यरत मंडळींना हा कालावधी अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकते. आपल्या आयुष्याला प्रेमाचा गोडवा लाभू शकतो. जोडीदारासह चार सुखाचे क्षण अनुभवता येऊ शकतात.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

शुक्र ग्रह वक्री होऊन मिथुन राशीला अनुकूल असा कालावधी अनुभवता येऊ शकतो. अचानक व अनपेक्षित रूपात धनलाभ झाल्याने येत्या काळात काही मोठे व महत्त्वाचे निर्णय घेता येऊ शकतात. कौटुंबिक सुखासाठी तुम्ही माध्यम ठरू शकता यामुळे तुमच्यावरील जबाबदारी व तुमचा आदार वाढण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणहून अडकलेले पैसे लवकरच परत मिळू शकतात.

हे ही वाचा << चार महिन्यात ‘या’ तारखांना मुसळधार पाऊस बरसणार? नक्षत्रांनुसार जाणून घ्या पावसाची भविष्यवाणी

तूळ रास (Libra Zodiac Horoscope)

तूळ राशीचे मूळ स्वामी शुक्र आहेत त्यामुळे शुक्र देव वक्री अवस्थेत सुद्धा आपल्या राशीला प्रचंड फायदा मिळवून देऊ शकतील. करिअरधे एक पाऊल पुढे शकते. मोठे पद, सॅलरी, आणि प्रगती यामुळे आयुष्यात स्थैर्य येऊ शकते. विवाहइच्छुक मंडळींना एखादे स्थळ चालून येऊ शकते. धनलाभ झाल्याने कर्जमुक्ती होऊ शकते. आयुष्यात राजेशाही थाट अनुभवता येऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, आम्ही याची पुष्टी करत नाही)