Guru Shukra Gochar 2024 Parivartan Rajyog: देवगुरु गुरु आणि राक्षसांचे गुरु शुक्र एका ठराविक काळानंतर राशी बदल करतात, ज्याचा निश्चितपणे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. या वर्षी गुरु फक्त वृषभ राशीत असेल, तर शुक्र दर २६ दिवसांनी आपली राशी बदल करतो. अशात ७ नोव्हेंबरला शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. शुक्राचा गुरुच्या राशीत प्रवेश झाल्यामुळे आणि गुरु शुक्राच्या वृषभ राशीत असल्यामुळे परिवर्तन राजयोग तयार होत आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रह काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळवू शकतात. चला जाणून घेऊया गुरु-शुक्र यांच्या राशी बदलामुळे कोणत्या तीन राशींना बंपर लाभ होऊ शकतो.
द्रिक पंचांगानुसार, शुक्र ७ नोव्हेंबरला पहाटे ३.३९ वाजता गुरुच्या राशीत धनु राशीत प्रवेश करेल आणि २८ डिसेंबरपर्यंत या राशीत राहील. याचबरोबर गुरु ग्रह आधीच शुक्राच्या राशीत वृषभ राशीत आहे. अशा स्थितीत तो २८ डिसेंबरपर्यंत या राशीत राहील.
गुरु- शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ राशी होतील मालामाल
सिंह
गुरु आणि शुक्राच्या राशी बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो. या काळात भविष्याची आणि प्रगतीची चिंता थोडी कमी होऊ शकते. तसेच या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी राशी परिवर्तन योग खूप फायदेशीर ठरू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. शुक्र आणि गुरुच्या चांगल्या स्थितीमुळे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय सरकारी कामात यश मिळू शकते. तसेच शश राजयोग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते आणि भरपूर आर्थिक लाभ होऊ शकतो. एकाग्रताही वाढेल. व्यवसाय आणि करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होऊ शकतात.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु शुक्र राशी परिवर्तन योग फायदेशीर ठरू शकतो. या काळात कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते, तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. वैवाहिक जीवनातच आनंद येऊ शकतो. यातून घर, वाहन, मालमत्ता घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अचानक नशीब उघडू शकते. अशा स्थितीत अमाप संपत्ती मिळवता येऊ शकते. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही राशी परिवर्तन योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात पैशांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. करिअरमध्ये सुरू असलेल्या अडचणी आता संपू शकतात, त्यामुळे व्यवसाय चांगला होऊ शकतो.
(वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे.)