Shukra Ketu Yuti 2024: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाने २४ ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश केला असून या राशीत आधीपासून केतू ग्रह उपस्थित आहे. ज्यामुळे कन्या राशीत आता शुक्र आणि केतू ग्रहाची युती निर्माण झाली आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीचे काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील.

ज्योतिषाशास्त्रात जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत विराजमान असतात तेव्हा त्या ग्रहांची युती निर्माण होते. ही युती काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ परिणाम देते. शुक्र-केतूच्या युतीमुळे काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल. तसेच त्यांच्या आयुष्यात धनप्राप्ती देखील होईल.

Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Sun-Saturn conjunction in 2025
२०२५ मध्ये सूर्य-शनीची युती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक क्षेत्रात यश
shani created Shash Mahapurush Rajyog after 30 years
३० वर्षानंतर शनि बनवणार शश पंचमहापुरुष राजयोग; ‘या’ तीन राशींचे लोक होतील गडगंज श्रीमंत
Venus and Rahu yuti in meen rashi
शुक्र आणि राहू देणार बक्कळ पैसा; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार

युतीची कमाल तीन राशी होणार मालामाल

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्र-केतूच्या युतीचा चांगला परिणाम पाहायला मिळेल. या काळात मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. प्रगती करण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हे राशी परिवर्तन खूप सकारात्मक परिणाम देणारे सिद्ध होईल. या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आनंदी वार्ता कळतील.

हेही वाचा: आता पडणार पैशांचा पाऊस! सप्टेंबर महिन्यात निर्माण होणार चतुर्ग्रही योग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींची होणार चांदी

कन्या

कन्या राशीतीच ही युती निर्माण होत असल्याने या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील, जोडीदारासह चांगला वेळ घालवाल. बँक बॅलन्स वाढेल, मेहनतीचे फळ मिळेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader