Shukra Margi 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सुख आणि समृद्धीचा कारक शुक्र ग्रह जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा तेव्हा सर्व राशींवर त्याचा परिणाम होतो. शुक्र ग्रह २ मार्च रोजी मीन राशीत वक्री झाला होता. आता १३ एप्रिल २०२५ रोजी शुक्र देव पुन्हा मार्गी होणार आहे. म्हणजेच तो सरळ चाल चालणार आहे. शुक्र मीन राशीत विराजमान असून, मीन ही शुक्राची उच्च रास आहे. म्हणजेच या राशीत शुक्राची फले सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट असू शकतात. त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच या लोकांच्या संपत्तीतही वाढ होऊ शकते. जाणून घेऊ कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी, ज्यांना या शुक्र देवाच्या सरळ चालीमुळे अधिक लाभ होऊ शकतो.

‘या’ राशींचं पालटणार नशीब?

वृषभ

शुक्र देवाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात तुमच्या जीवनात अनेक बदल दिसून येऊ शकतात. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. तुम्हाला विविध मार्गांतून उत्पन्नाच्या अनेक संधी मिळू शकतात. तुमची रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करू शकता. बेरोजगारांना नोकरीची नवीन संधी मिळू शकते. तुमच्या पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्क

शुक्र देवाच्या सरळ चालीमुळे कर्क राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. तुम्हाला नोकरीत प्रमोशन, नवीन नोकरी किंवा वेतनवाढ मिळू शकते. मेहनतीचे फळ मिळू शकते. व्यवसायासाठी हा कालावधी चांगला जाऊ शकतो. जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता. कुटुंबात आनंददायी वातावरण असू शकतो.

वृश्चिक

शुक्र देवाच्या सरळ चालीमुळे वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. अविवाहित लोकांचे लग्न ठरू शकते. तिजोरीमध्ये या काळात धनसंपदा राहू शकते. नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. व्यवसायिकांसाठीही हा काळ उत्तम ठरू शकतो. उत्पन्नाचे अनेक मार्ग तुम्हाला सापडू शकतात.

धनू

धनू राशीच्या लोकांना शुक्र देवाच्या कृपेने शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. बिझनेसमध्ये एखादी मोठी डील फायनल होऊ शकणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यात यश मिळू शकणार आहे. काही नवीन काम सुरू करणे फायदेशीर ठरू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे, लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)