Shukra Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा सुख, सौभाग्य, ऐश्वर्य, संपत्ती, प्रेम आणि वैभवाचा कारक आहे. जेव्हा शुक्र राशी नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा वरील क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येतो. शुक्र ग्रह २ सप्टेंबर रोजी नक्षत्र परिवर्तन करणार आहे. शुक्र ग्रह फाल्गुनी नक्षत्रामधून हस्त नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. शु्क्र ग्रह १३ सप्टेंबरपर्यंत या नक्षत्रामध्ये विराजमान राहणार आहे. अशात शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहेत. तीन राशी अशा आहेत, ज्यांचे नशीब चमकू शकते.

वृषभ राशी (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरू शकते. कारण शुक्र ग्रह वृषभ राशीचा स्वामी आहे. तसेच शुक्र ग्रह आता या राशीच्या पाचव्या स्थानावर विराजमान आहे. या दरम्यान या लोकांना त्यांच्या मुलांकडून शुभ वार्ता मिळू शकते. तसेच ज्या लोकांना विद्यार्थी, साहित्य, आणि लिखाण इत्यादी क्षेत्रात करिअर बनवायचे असेल त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. या राशीच्या लोकांची भौतिक सुखामध्ये वृद्धी होईल. ज्या लोकांचे प्रेम संबंध आहे त्यांना यश मिळू शकते. त्यांचा प्रेम विवाह होऊ शकतो.

Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश

हेही वाचा : गणपती आगमनाची भीषण बाजू; VIDEO पाहून थरकाप उडेल, पाहा आणि तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?

मिथुन राशी (Mithun Zodiac)

शुक्र ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते. शुक्र ग्रह या राशीच्या गोचर कुंडलीच्या सुख भावामध्ये स्थित आहे. या दरम्यान या लोकांना सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते. सामाजिक जीवनात ते मोकळेपणाने संवाद साधू शकतील. या लोकांना वाहन आणि प्रॉपर्टी मिळू शकते. या दरम्यान यांना पितृ संपत्ती प्राप्त होऊ शकते. याशिवाय या लोकांना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. या काळात या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील.

सिंह राशी (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन शुभ ठरणार आहे. शुक्र ग्रह सिंह राशीच्या लोकांना आर्थिक फायदा घेऊन जाणार आहे. त्यामुळे या वेळी या राशीच्या लोकांच्या वाणीमध्ये प्रभाव दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. या लोकांना अडकलेले पैसे मिळतील. हे लोक धन संपत्ती वाचवू शकतात. व्यवसायात फायदा होऊ शकतो. या लोकांच्या जीवनात प्रगतीचे नवे मार्ग सापडतील. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader