Shukra Nakshatra parivartan 2024: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. येत्या ११ डिसेंबरपासून शुक्र श्रवण नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून शुक्राचे हे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल.

पंचांगानुसार, शुक्र ११ डिसेंबर रोजी सकाळी ३ वाजून २७ मिनिटांनी श्रवण नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. तसेच या नक्षत्राची रास मकर आहे.

Daily Horoscope 11 December 2024 in Marathi
११ डिसेंबर पंचांग: मोक्षदा एकादशीला धनूसह ‘या’ राशींना भगवान विष्णूसह लक्ष्मीही देईल आशीर्वाद; वाचा तुमचा बुधवार कसा जाणार?
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Budh Uday In Scorpio 2024 horoscope 2025
Budh Uday 2024 : ९ तासांनंतर बुध उदयाने एका झटक्यात ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही व्हाल कोट्यधीश?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य

तीन राशींवर शुक्राची कृपा

वृषभ

शुक्र श्रवण नक्षत्रामध्ये प्रवेश करून या राशीच्या नवव्या घरामध्ये विराजमान होईल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

धनु

शुक्राचे नक्षत्र परिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात धनु राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील. आकस्मिक धनलाभ होईल.

हेही वाचा: २०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

मकर

शुक्राचे नक्षत्र परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींना सकरात्मक फळ देईल. तुम्हाला अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.

(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader