Shukra Rashi Parivartan 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा संपत्ती, विलास, प्रेम आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. ७ ऑगस्ट २०२३ रोजी शुक्राने आपले राशी बदलून कर्क राशीत प्रवेश केला आहे. कर्क राशीत शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘गजलक्ष्मी राजयोग’ निर्माण होत आहे. हा राजयोग अतिशय शुभ आहे. या राजयोगाचा प्रभाव पाच राशींवर पडणार असून यामुळे या राशीतील लोकांचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. गजलक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना जीवनात अपार सुख आणि सुविधा मिळू शकतात, २ ऑक्टोबर २०२३ पर्यंत हे लोक राजासारखे जीवन जगू शकतात, चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचे भाग्य उजळणार?
मिथुन
शुक्राच्या गोचरामुळे तयार झालेला गजलक्ष्मी राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरु शकतो. या लोकांच्या आर्थिक स्थितीत तेजी येण्याची शक्यता आहे. पैसे मिळण्याचे नवे मार्ग उघडू शकतात. पैसे कमावण्यासोबतच तुम्ही बचत आणि गुंतवणूक करण्यातही यशस्वी होऊ शकता.
कर्क
शुक्राचे गोचर कर्क राशीत झाले आहे, जे या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिध्द होऊ शकते. गजलक्ष्मी राजयोगामळे कर्क राशीच्या लोकांना भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात समृद्धी येऊ शकते. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण या काळात पूर्ण होऊ शकतात.
(हे ही वाचा : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा? बक्कळ धनलाभासह मिळू शकतो व्यवसायात भरपूर नफा)
कन्या
शुक्राचे गोचर कन्या राशीच्या लोकांना प्रगती आणि संपत्ती देऊ शकते. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनात सुख-समृद्धी वाढू शकते. काही चांगली बातमी मिळू शकते.
तूळ
शुक्राचा राशी बदल तूळ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि फलदायी सिद्ध होऊ शकतो. भाग्य या लोकांना साथ देऊ शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून प्रेमसंबंधात बळ येऊ शकते.
मकर
मकर राशीच्या लोकांच्या जीवनात भौतिक सुखसोयी वाढू शकतात. आर्थिक समस्या संपू शकतात, करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायासाठी हा वेळ चांगला ठरु शकतो, तुमची जोरदार प्रगती होऊ शकते. काम चांगले होऊ शकतात आणि जीवनात आनंद मिळू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)