shukra-shani Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबर २०२४ च्या शेवटी शनी आणि शुक्र यांचा कुंभ राशीत संयोग होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी आणि शुक्र यांच्यात मैत्रीचे संबध आहेत, असे मानले जाते. म्हणून त्यांचा संयोग काही राशींसाठी शुभ ठरून, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण येऊ शकतात. विशेषत: २०२५ च्या सुरुवातीला या राशींना आर्थिक लाभ, प्रगती व यश मिळण्याची शक्यता आहे. या नेमक्या कोणत्या राशी आहेत, ज्यांचे नशीब या काळात चमकू शकते ते जाणून घेऊ…
शुक्र-शनी युतीने ‘या’ राशी होणार श्रीमंत! प्रत्येक कामात मिळणार यश
मेष
शनी-शुक्राचा संयोग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते. करिअरच्या दृष्टिकोनातूनही हा काळ खूप फलदायी ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. या काळात तुम्हाला प्रवासाची संधी मिळेल, ज्यातून तुम्हाला करिअरच्या दृष्टीने फायदा होईल. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. अशाने तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन
शुक्र-शनी संयोग मिथुन राशीच्या लोकांसाठीही अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. नोकरदार लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. यावेळी विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित कामानिमित्त प्रवास घडू शकतो, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनी आणि शुक्राचा संयोग विशेष फायदेशीर ठरेल. कारण- ते तुमच्या कुंडलीच्या चढत्या घरात तयार होत आहे. या संयोगाने तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात विस्तार होईल. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांसाठी हा काळ विशेष आनंदाचा असेल. भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा होईल. अविवाहित लोकांसाठीही लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.