Mahalaxmi RajYog Effects: ज्योतिष शास्त्रानुसार सर्व नवग्रह हे वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. या ग्रहांच्या स्थितीनुसार अनेकदा राजयोगांची निर्मिती सुद्धा होते. काही योग तर अत्यंत दुर्मिळ व शुभ मानले जातात. येत्या ७२ तासांनी म्हणजेच ६ एप्रिल २०२३ शुक्र गोचर होऊन महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. हा योग तेव्हा बनतो तेव्हा धनदेवता गुरु व शुक्र त्यांच्या राशीत उच्च स्थानी असतात. ६ एप्रिलला शुक्र व गुरुच्या युतीने महालक्ष्मी योग बनत आहे ज्यामुळे ४ राशींच्या नशिबाचे दार उघडणार असल्याची चिन्ह आहेत. या राशींचा भाग्योदय हा नवनवीन संधींसह अमाप धनलाभ व बक्कळ पैसा कमावण्याचे योग घेऊन आला आहे. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होणार हे पाहूया…

७२ तासांनी ‘या’ राशींचा भाग्योदय होणार?

वृषभ रास (Taurus Zodiac)

लक्ष्मी योग बनल्याने वृषभ राशीच्या मंडळींना नशिबाची भक्कम साथ लाभू शकते. लक्ष्मी योगासह या राशीत शनी कृपेचा शश व मालव्य राजयोग सुद्धा तयार झाला आहे. यामुळे येणारा काही काळ हा तुमच्या राशीसाठी अगदी लाभदायक ठरू शकतो. या दिवसात बेरोजगार मंडळींना कामाची व आवडीच्या नोकरीची संधी लाभू शकते. कर्मचाऱ्यांना पगारवाढ व पदोन्नत्तीचे योग आहेत. तर तुमची आर्थिक स्थिती भरभक्कम झाल्याने मानसिक स्थिती सुद्धा आनंददायी राहू शकते.

Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shani Pluto Ardhakedra Yog
२२ जानेवारीला शनि-यम निर्माण करणार शक्तीशाली योग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, अचानक होईल धनलाभ
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Surya gochar in Makar rashi
१४ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींनी राहावे सतर्क; करावा लागू शकतो आर्थिक समस्यांचा सामना
1st anniversary celebrations of Ram Lalla idol consecration
अयोध्येत रामभक्तांची गर्दी ; रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन सोहळा

कन्‍या रास (Kanya Rashi)

कन्या राशीच्या मंडळींना सुद्धा लक्ष्मी योग बनल्याने बक्कळ पैसे कमावता येऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित रूपात माता लक्ष्मीची साथ लाभू शकते. नशीब सुद्धा तुमच्या बाजूने असणार आहे. लांबच्या प्रवासाचे योग आहेत. तसेच प्रगतीपथावर तुम्हाला काही पाऊले पुढे जाता येऊ शकते.

मकर रास (Makar Rashi)

लक्ष्मी योग हा मकर राशीच्या लोकांना लाभदायक सिद्ध होऊ शकतो. तुम्हाला अचानक धनलाभ झाल्यास भांबावून जाऊ नका. अत्यंत सावध निर्णय घेतल्यास तुम्ही काहीच दिवसात धन दुप्पट वेगाने वाढताना अनुभवू शकता. लग्न स्थानी गुरुकृपा असल्याने तुम्हाला लग्नासाठी किंवा प्रेमासाठी शुभ योग आहेत.

हे ही वाचा<< ३०० वर्षांनी नवपंचम राजयोग बनल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? सूर्य व मंगळ शनी प्रिय राशींना देतील धनलाभाची संधी

कुंभ रास (Kumbh Rashi)

कुंभ राशीच्या गोचर कुंडलीत अगोदरच शनीचा शश राजयोग बनलेला आहे यात आता लक्ष्मी योग जुळून आल्याने या राशीला सोन्याहून पिवळा सुखाचा काळ अनुभवता येऊ शकतो. तुमच्या भाग्यात येत्या काळात शेअर मार्केट व आय गुंतवणुकीतून मोठा लाभ होण्याची चिन्हे आहेत. उच्च शिक्षणाच्या संबंधित मोठ्या संधी लाभल्याने तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्हाला आर्थिक समस्यांमधून बाहेर काढणारी एखादी मोठी घटना घडू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader