Venus Transit in Taurus 2023: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर किंवा वक्री स्थितीत येऊन राशी व नक्षत्र बदल करत असतात. प्रेम, संपत्ती व वैभवाचे कारक शुक्र ग्रह अलीकडेच वृषभ राशीत प्रवेश घेऊन स्थिर झाले आहेत. येत्या ४८ तासात शुक्रदेव वृषभ राशीत उच्च स्थानी पोहोचणार आहेत. १२ एप्रिलला शुक्रदेव एक पायरी वर गेल्याने म्हणजेच लग्न व नवांश कुंडलीत आल्याने ग्रहाची ताकद सर्वोच्च असणार आहे. म्हणजेच शुक्राचा अन्य राशींवरील प्रभाव भरभक्कम व प्रबळ होणार आहे. शुक्र ग्रह जन्मकुंडली मध्ये १२ एप्रिल ते १५ एप्रिल २०२३ पर्यंत कायम असणार आहे. तोपर्यंत खालील ४ राशींना प्रचंड लाभ होण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुकदेव ‘या’ राशींना धनरूपात देणार आशीर्वाद

वृषभ रास (Taurus Zodiac)

शुक्र ग्रह वृषभ राशीत सर्वोच्च स्थानी पोहोचल्यावर स्वराशीला बक्कळ धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. तसेच वृषभ राशीच्या मंडळींनामान – सन्मान वाढल्याने धनवृद्धी होण्याची चिन्हे आहेत. लोकांचा अतुमच्यावरील विश्वास वाढू शकतो. तुम्हाला आई वडिलांच्या स्वरूपात मदतीचा हात अनपेक्षितपणे लाभू शकतो. व्यवसाय वाढीचे संकेत आहेत.

कर्क रास (Cancer Zodiac)

शुक्र ग्रह सर्वोच्च स्थानी पोहोचल्यावर कर्क राशीला सुद्धा सुखाचे चांदणे अनुभवता येऊ शकते. कर्क राशीच्या नशिबात धनलाभाचेच नव्हे तर दीर्घकाळ टिकणाऱ्या संपत्तीचे योग आहेत. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास प्रचंड मोठा लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना मेहनतीचे गोड फळ मिळू शकते.

कन्या रास (Kanya Rashi )

शुक ग्रह सर्वोच्च झाल्यावर कन्या राशीच्या मंडळींना जुन्या गुंतवणुकीचे प्रचंड मोठे फायदे मिळू शकतात. तुम्हाला परदेश वारीचे योग आहेत. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. मनाला शांती मिळू शकते.

हे ही वाचा<< शनिदेव आजपासून ‘या’ राशींना देतील प्रचंड धनलाभ? शक्तीशाली बनून बनवू शकतात करोडपती

सिंह रास (Sinha Rashi)

शुक्र ग्रह सर्वोच्च स्थानी पोहोचताच सिंह राशीला बक्कळ धनलाभ होऊ शकतो. सिंह राशीला मान- सन्मानाने अत्यंत भावनिक काळ अनुभवता येऊ शकतो. शुक्र ग्रह विशेषतः राजकारणी मंडळींना अधिक लाभदायी ठरू शकतो. तुम्हाला इच्छापूर्तीची संधी मिळू शकते. नोकरीत पगार जाण्याची चिन्हे आहेत तुम्हाला संधी स्वीकारण्याची वेळ निवडावी लागेल. निर्णय मेंदूने घ्या.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra to be powerful in next 48 hours these zodiac signs luck to see extreme changes with lakhs rupees benefits money astro svs