Venus Transit 2023: ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार शुक्र हा धन, वैभव, सुख व ऐश्वर्य यांचा दाता मानला जातो. शुक्राचे चांदणे हे अपार प्रेमाचे प्रतीक मानले जाते. यामुळेच नवग्रहांमध्ये शुक्राला महत्त्वाचे स्थान आहे. जेव्हा नवग्रह आपापल्या गतीनुसार राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येतो. येत्या फेब्रुवारी महिन्यात शुक्र ग्रह यंदाचे महत्त्वाचे व मोठे राशी परिवर्तन करणार आहे. शुक्र स्वतःच्या लग्न राशीत म्हणजेच मीन मध्ये गोचर करणार असून यामुळे काही राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते. या राशी परिवर्तनामुळे काही राशींना अचानक धनलाभ होण्याचे पूर्ण योग आहेत. शुक्र मीन राशीत अगोदरच उपस्थित असणाऱ्या गुरु ग्रहासह एक लाभदायक युती तयार करणार आहे.

शुक्र गोचर: ‘या’ राशींना प्रेमाने मिळू शकतो बक्कळ पैसा

मिथुन (Gemini)

शुक्र गोचर हे मिथुन राशीसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. आपल्या राशीच्या कुंडलीत शुक्र गोचर हे दशम स्थानी होणार आहे. हे स्थान कार्यस्थळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येत्या काळात आपल्याला नव्या नोकरीच्या संधी येण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीतून आपल्याला धनलाभ सुद्धा होऊ शकतो. आपण ज्या ठिकाणी कार्यरत आहात तिथून सुद्धा आपल्याला अधिक पगाराची ऑफर मिळू शकते. मिथुन राशीच्या महिलांच्या भाग्यात प्रेम योग आहे, येत्या काळात तुम्हाला नव्याने प्रेम अनुभवण्याची संधी येऊ शकते.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
After 12 years the alliance of Jupiter and Moon will brighten the fortunes of 4 zodiac signs dreams will be fulfilled in 2025
१२ वर्षांनंतर गुरू आणि चंद्रच्या युतीने ४ राशींचे भाग्य उजळणार, २०२५मध्ये स्वप्न होतील पूर्ण, घर-वाहन खरेदीचा निर्माण होईल योग
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी
Surya Grahan 2025 And Shani Gochar
१०० वर्षांनंतर निर्माण होणार शनी गोचर आणि सुर्य ग्रहाचा संयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळेल यश
Budh Margi 2024
आजपासून बुधाचा जबरदस्त प्रभाव देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि मानसन्मान

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या सप्तम भावी शुक्र गोचरचा सकारात्मक प्रभाव होऊ शकतो. शुक्र हा प्रेमळ ग्रह मानला जातो. शुक्राच्या प्रभावाने येत्या काळात आपल्याला जोडीदाराची साथ लाभू शकते. तुमच्या प्रेम संबंधात सुधार झाल्याने मन सुद्धा आनंदी राहू शकते ज्याचा उत्तम प्रभाव आरोग्यावर सुद्धा दिसून येऊ शकतो. शुक्र राशीच्या महिलांना मित्रमंडळींकडून कामात प्रचंड मोठी मदत होऊ शकते याच कामातून आपल्याला मोठ्या धनलाभाचे सुद्धा योग आहेत. वाहन खरेदीसाठी येणारा काळ अत्यंत शुभ ठरू शकतो. शुक्राच्या कृपेने येत्या काळात घरगुती प्रसन्नता अनुभवता येऊ शकते.

हे ही वाचा<< ४८ तासांनी ‘या’ ३ राशींना माता लक्ष्मी देणार धनलाभ? ३ ग्रहांची चाल बदताच तुम्हीही होऊ शकता प्रचंड श्रीमंत

तूळ (Libra)

तूळ राशीच्या कुंडली कक्षेत सहाव्या स्थानी शुक्र गोचर प्रभावी होणार आहे. यामुळे येत्या काळात तुम्हाला शत्रूवर मात करण्याची संधी मिळेल. नॉरकीच्या बाबत नशीब आपले साथ देऊ शकते. अचानक धनलाभ झाल्याने गोंधळून जाऊ नका. तुम्हाला मनसोक्त खर्च करता आययू शकतो पण सेव्हिंग व गुंतवणुकीचा सुद्धा विचार करा. महिलांसाठी शुक्र गोचर खूप लाभदायक ठरू शकते, आपण कलाक्षेत्रात आपले नशीब आजमावून पाहत असाल तर नक्कीच आपल्याला यश लाभण्याचे पूर्ण संकेत आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader