Shukra Transit Mahabhagya Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्याचा शुभ अशुभ प्रभाव हा मानवी जीवनावर दिसून येतो. येत्या गुढीपाडव्याला ३० वर्षांनी महाभाग्य राजयोग तयार होत आहे. या राजयोगाने सर्वच १२ राशींच्या भाग्यात मोठ्या उलाढाली पाहायला मिळणार आहेत. मात्र तीन अशा राशी आहेत ज्यांच्या भाग्यात खरोखरच येत्या काही महिन्यांमध्ये धनलाभाचा व प्रगतीचा वर्षाव होताना पाहायला मिळु शकतो. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो चला तर पाहूया…
महाभाग्य राजयोग बनल्याने ‘या’ राशी होतील प्रचंड श्रीमंत?
धनु (Dhanu Zodiac)
महाभाग्य राजयोग बनल्याने धनु राशीच्या मंडळींसाठी आर्थिक लाभाची स्थिती तयार होत आहे. येत्या काळात आपल्याला व्यवसायात प्रचंड लाभासह प्रगतीचे सुद्धा योग आहेत. नोकरदार मंडळींना येत्या काही महिन्यांमध्ये वरिष्ठांच्या मर्जीत राहावे लागू शकते पण यामुळे आपल्या भाग्यात पदोन्नत्तीचे सुद्धा योग तयात होऊ शकतात. व्यवसायिक मंडळींना काही महत्त्वाच्या निर्णयांना सामोरे जावे लागेल ज्यामुळे तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर संशय येऊ शकतो. अशावेळी आपले मानसिक संतुलन सांभाळा. तुम्हाला शेअर मार्केट मधून गुंतवणुक करून प्रचंड धनलाभ होऊ शकतो.
मिथुन (Mithun Zodiac)
महाभाग्य राजयोग हा मिथुन राशीच्या भाग्याचे दार उघडू शकतो. येत्या काळात मंगळ ग्रह आपल्या राशीत प्रवेश घेत असल्याने आपल्याला एकूणच साहस व पराक्रम अनुभवता येऊ शकतो. वाडवडिलांच्या संपत्तीचा हक्क मिळण्याची चिन्हे कुंडलीत आहेत. तुमच्या कुंडलीत हंस राजयोग सुद्धा तयार होत आहे. या काळात आपल्याला अनपेक्षित धनप्राप्ती होऊ शकते. तुम्हाला प्रलंबित कामे पूर्ण करून त्यातून आर्थिक लाभ मिळवण्याचे योग आहेत. तुम्हाला काही प्रमाणात खर्च वाढल्याचे सुद्धा जाणवू शकते.
हे ही वाचा<< २२ मार्चला चैत्र महिना सुरु होताच ‘या’ ४ राशींना लक्ष्मी देणार बक्कळ धनलाभ? पाहा तुमच्या राशीचे भविष्य
कर्क (Cancer Zodiac)
महाभाग्य राजयोग बनल्याने कर्क राशीच्या मंडळींचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. तुम्हाला येत्या काही दिवसांमध्येच विमान प्रवासाची संधी लाभू शकते. ज्यांचा व्यवसाय परदेशी कंपनीशी संबंधित आहे त्यांना येत्या काळात कामाचा दबाव वाढल्याचे जाणवून येईल. तुम्हाला जुन्या कर्माचे एखादे फळ मिळण्याची शक्यता आहे. वाहन व प्रॉपर्टीच्या खरेदीच्या बाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)