Venus Uday In Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला धन वैभव आणि ऐश्वर्य तसेच लक्झरीचा कारक मानला जाते. त्यामुळे जेव्हा शुक्र ग्रहाच्या चालीमध्ये परिवर्तन दिसून येते तेव्हा या सेक्टरमध्ये खास प्रभाव दिसून येतो. धन वैभवाचा दाता शुक्र ग्रह २३ मार्च रोजी उदय होणार आहे.
शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशी मीनमध्ये उदय होणार आहे. अशात शुक्र ग्रह उदित झाल्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. पण तीन अशा राशी आहेत ज्यांचे नशीब चमकू शकते. करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकते. जाणून घेऊ या त्या लकी राशी कोणत्या आहेत.

वृषभ राशी (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांना शुक्र ग्रह उदित होणे सकारात्मक सिद्ध होऊ शकते. कारण शुक्र ग्रह या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये इनकम आणि लाभ स्थानावर उदित होणार आहेत. त्यामुळे या लोकांची प्रोफेशनल जीवनात यश मिळू शकते. तसेच जे लोक कला, संगीत, आणि अभिनय क्षेत्राशी जुळलेले आहे त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक सिद्ध होऊ शकतो.

नोकरी करणाऱ्या लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. तसेच गुंतवणूकीपासून लाभ मिळू शकतो. जे लोक नोकरी करतात. समाजाता या लोकांचा मान सन्मान वाढणार. नात्यात मजबूती येणार. तसेच कौटुंबिक शांती लाभेल.

कर्क राशी (Cancer Zodiac)

शुक्र ग्रहाचा उदित होणे कर्क राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते. कारण शुक्र ग्रह या राशीच्या नवव्या भावात उदित होत आहे. त्यामुळे या लोकांच्या आत्मविश्वासात वृद्धी दिसून येईल तसेच या लोकांमध्ये नवीन ऊर्जा दिसून येईल. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होईल.
या दरम्यान हे लोक देश विदेशात प्रवास करू शकतात. तसेच या दरम्यान हे लोक कोणत्याही धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी करू शकतात. करिअरमध्ये प्रगती मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत राहीन. नवीन स्त्रोतांपासून पैसे कमावू शकतात.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे उदित होणे लाभदायक ठरू शकते. कारण शुक्र ग्रह या राशीच्या कर्मभावात उदित होणार आहे. त्यामुळे या वेळी या लोकांच्या काम व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल तर भरपूर लाभ मिळू शकतात.
गुंतवणूक किंवा प्रॉपर्टीशी जुळलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात. व्यवसायाशी जुळलेले लोक व्यवसायात लाभ मिळवू शकतात. नवीन योजनांवर काम केल्यास त्यांना यश मिळू शकते. ही वेळ गुंतवणूक आणि पैसे वाचवण्यासाठी उपयुक्त आहे. या वेळी नोकरी शोधणाऱ्या लोकांना नोकरी मिळू शकते. तसेच नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)