ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष महत्व आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा शारीरिक सुख, वैवाहिक सुख, विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य आणि प्रणय यांचा कारक मानला जातो. शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे आणि मीन हे त्याची उच्च राशी आहे, तर कन्या ही दुर्बल राशी आहे. अशातच आता शुक्र वक्री होत अस्त देखील झाला आहे. वक्री शुक्र अस्त १२ राशींवर प्रभाव टाकत आहे. ज्याचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम होणार आहे. तर कोणत्या राशीवर काय परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ –

शुक्राचा उदय झाल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. व्यवहारासाठी हा काळ शुभ ठरु शकतो. तसेच तुम्हाला या काळात धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. नवीन कार्य सुरू करण्यासाठी ही वेळ शुभ ठरु शकते. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवू शकता.

मिथुन –

शुक्र उदयाच्या काळात मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या नशीबाची साथ मिळू शकते. मंगळ गोचरचा काळ नोकरी आणि व्यवसायासाठी शुभ ठरु शकतो. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. तसेच या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येऊ शकतो.

वृश्चिक –

वृश्चिक राशीच्या लोकांना शुक्र उदयाचा लाभ होऊ शकतो. या काळात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो. कामाच्या ठिकाणी सर्वांवर विश्वास ठेवणे शक्यतो टाळा. नोकरी-व्यवसायासाठी हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरु शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते.

हेही वाचा- नोव्हेंबरपासून वृषभसह ‘या’ राशींवर शनिदेव करणार कृपा? ‘शश राजयोगा’मुळे होऊ शकतात कोट्याधीश

धनु –

शुक्राचा उदय धनु राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देऊ शकतो. व्यापाऱ्यांना मंगळ गोचरचा फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही जोडीदाराबरोबर वेळ घालवू शकता. कुटुंबीयांचेही पूर्ण सहकार्य मिळू शकता. कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra uday will the fate of these zodiac signs change as soon as venus rises chances of advancement in job and business jap