Shukra-Varun yuti 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांव्यतिरिक्त काही ग्रह असे देखील आहेत ज्यांना सौर मंडळाचा भाग मानले जात नाही. परंतु त्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. अरूण, प्लूटो या ग्रहांव्यतिरिक्त वरूण ग्रहालाही खूप खास मानले जाते. वरूण ग्रहाला ‘नेप्च्यून’ देखील म्हटले जाते. या ग्रहाला १२ राशींचे संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला तब्बल १६४ वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे नेप्च्यूनच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीवर विविध प्रकारे होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचांगानुसार, ११ सप्टेंबर २०२२ रोजी नेप्च्यून ग्रहाने कुंभ राशीमध्ये प्रवेश केला होता. तसेच १९ फेब्रुवारी २०२३ रोजी या ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला असून तो २७ जून २०२५ पर्यंत या राशीतच वराजमान असेल. तसेच शुक्र ग्रहदेखील सध्या मीन राशीत विराजमान आहे. या राशीत या दोन ग्रहांची युती निर्माण झाली असून या दोन ग्रहांच्या युतीमुळे ‘माया’ योग निर्माण होत आहे ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या आयुष्यावर होईल.

‘या’ तीन राशींची होणार चांदी

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी माया योग अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. सहकर्चचाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील.

कन्या

माया योग कन्या राशीसाठीही खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी माया योग सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल. या काळात अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल. स्पर्धा परिक्षेत यश मिळवाल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra varun yuti 25 effective maya yoga of venus and neptune yuti in meen rashi three zodic get material happiness with promotion sap