Shukraditya Yoga 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन करत आहे ज्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. अशात ग्रहाचे राजा सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतात ज्याचा परिणाम कोणत्या ना कोणत्या राशींवर दिसून येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर्य १४ मार्चला सूर्य मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि शुक्र मीन राशीमध्ये आधीच विराजमान आहे. अशात सूर्य आणि बुध ग्रहाची युती निर्माण होत असून शुक्रादित्य योग निर्माण होत आहे. शुक्रादित्य योग निर्माण झाल्याने काही राशींच्या लोकांना नशीब चमकू शकते. काही राशींना सतर्क राहण्याची गरज आहे. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

वृषभ राशी (Vrishabha Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य योग लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या अकराव्या भावात सूर्याची युती निर्माण होत आहे ज्याचा परिणाम या लोकांना प्रत्येक क्षेत्रात दिसून येईल. या लोकांना अपार यशाबरोबर धनलाभ मिळू शकतो. वरिष्ठांचे सहकार्य लाभेन ज्याचा करिअरमध्ये लाभ मिळू शकतो. व्यवसायात तयार केलेली रणनीती फायदेशीर ठरू शकते. आर्थिक स्थिती उत्तम राहीन आणि या लोकांना धन संपत्तीचा लाभ मिळू शकतो. पैशांची बचत होऊ शकते. जीवन उत्तम राहीन आणि जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

या राशीच्या दहाव्या भावात शुक्रादित्य योग निर्माण होत आहे. या राशीच्या लोकांच्या प्रयत्नांना यश मिळू शकते. नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकते. व्यवसायात खूप लाभ मिळू शकतो.
आर्थिक स्थिती चांगली राहीन. सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते. लव्ह लाइफ उत्तम राहीन. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकता.

तुळ राशी (Tula Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी सूर्य शुक्राची युती लाभदायक ठरू शकते. या राशीच्या नवव्या भावात शुक्रादित्य योग निर्माण होत आहे. अशात या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. करिअरमध्ये यश मिळू शकते.

कार्य क्षेत्रात उच्च अधिकाऱ्यांबरोबर चांगले संबंध निर्माण होणार, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. व्यवसायात क्षेत्रामध्ये अपार यश मिळू शकते. धन संपत्तीच्या बाबतीत आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन आर्थिक स्त्रोत मिळू शकतात. आरोग्य उत्तम राहीन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)