Six Planets yuti created Sanyog : ज्योतिषशास्त्रानुसार मार् २०२५मध्ये एक अद्भूत खगोलीय घटना घडणार आहे. सहा ग्रह एकाच राशीमध्ये एकाच वेळी एकत्रित येणार आहे. राहु आणि शुक्र आधीच मीन राशीमध्ये विराजमान आहे. फेब्रुवारी महिन्यात बुध सुद्धा या राशीमध्ये गोचर करणार त्यानंतर १४ मार्च रोजी या राशीमध्ये सूर्य सुद्धा विराजमान होईल. २८ मार्चला चंद्र या राशीत प्रवेश करेन आणि २९ मार्चला शनि सुद्धा या राशीमध्ये विराजमान होईल. अशात २९ मार्च रोजी मीन राशीमध्ये ६ ग्रहांची अनोखी युती दिसून येईल.
ग्रहांच्या या अद्भूत संयोगामुळे काही शुभ आणि अशुभ योग दिसून येईल. अशात जाणून घेऊ या सहा ग्रह मिळू कोणत्या राशींचे नशीब चमकवू शकतात.
वृषभ राशी
मीन राशीमध्ये सहा ग्रहांचा दुर्लभ संयोग वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणेल. काही लोकांना जीवनात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. शेवटी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नात्यामध्ये तणाव दिसून येईल. वैयक्तिक आयुष्यात समस्या वाढू शकतात. या लोकांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेन. हा काळ स्वत:ची काळजी घेण्यासाठी आणि स्वत:चा विकास करण्यासाठी चांगला आहे.
मिथुन राशी
मीन राशीमध्ये सहा ग्रहांचा अद्भूत संयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय खास असणार आहे. जोडीदाराबरोबर यांचे संबंध आणखी घट्ट होईल. करिअरमध्ये अचानर यश मिळू शकते. प्रामाणिकपणा दाखवा आणि शांततापूर्ण संवाद साधा. कोणतेही निर्णय खूप विचार करून घ्यावे आणि सक्रिय रहावे.
कन्या राशी
मार्च २०२५ मध्ये निर्माण होणारा हा दुर्लभ संयोग कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ आणि लाभदायक ठरू शकतो. ही वेळ वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाठी आव्हानात्मक तसेच फायदेशीर राहीन. खेळाशी संबंधित लोकांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते. आरोग्याशी संबंधित काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
मकर राशी
सहा ग्रहांचा अद्भूत संयोग मकर राशीच्या लोकांसाठी अतिशय खास असणार आहे. शुभ ग्रहाच्या प्रभावाने व्यवसायात मोठे यश मिळू शकते. खूप जास्त महत्त्वकांक्षा ठेवू नये. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. वरिष्ठांकडून कौतुक केल्या जाऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च मध्ये निर्माण होणार हा दुर्लभ संयोग लाभदायक ठरू शकतो. ग्रहांचा शुभता या राशीच्या लोकांना प्राप्त होऊ शकते ज्याचा शुभ परिणाम धन संपत्तीचे नवीन मार्ग दाखवेन. विवाहित लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. अनावश्यक खर्च करणे टाळावा. नोकरी करणाऱ्या लोकांना मोठे गिफ्ट मिळू शकतात. आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये चांगले प्रस्ताव येऊ शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)